Gujrat Dainik Gomantak
देश

Gujrat: वडिलांच्या मित्रांनीच केला घात, आठ वर्षाच्या मुलीची सामूहिक बलात्कारानंतर दगडाने ठेचून हत्या

तिघेही शेजारीच राहत होते आणि एकाच कारखान्यात काम करत होते.

Pramod Yadav

Gujrat Crime: गुजरातमधील राजकोटमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आठ वर्षीय मुलीवर तिच्या वडिलांच्या तीन विवाहित मित्रांनी सामूहिक बलात्कार केला असून, नंतर तिची हत्या केली. शनिवारी भक्तीनगर रेल्वे यार्डजवळ मुलीचा मृतदेह आढळून आला.

याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. गुजरातमधील एका हिंदी वृत्तपत्राने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

मिथिलेश कुमार उर्फ ​​कानियो दास (24, मूळचा बिहार), भरत मीना (38, रा. उदयपूर, राजस्थान) आणि अमरेश उर्फ ​​ब्रिजेश कुलदीप (25, रा. उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील रहिवासी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

संशयित आरोपी मुलीच्या वडिलांना आधीपासूनच ओळखत होता. तिघेही शेजारीच राहत होते आणि एकाच कारखान्यात काम करत होते. शुक्रवारी सायंकाळी ही मुलगी बेपत्ता झाली होती. त्याच्या वडिलांनी त्याच रात्री मालवीय नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोस्टमॉर्टममध्ये लैंगिक अत्याचाराची पुष्टी झाली आहे. मुलगी वडिलांना बलात्काराबद्दल सांगेल या भीतीने आरोपींनी तिची हत्या केली. पोलिसांनी दासला विरमगाममधून, मीनाला राजस्थानमधून आणि अमरेशला राजकोट शहरातून तिघांना अटक केली.

मुलगी घराजवळ खेळत असताना मिथिलेशने तिला आमिष दाखवून एका निर्जन ठिकाणी नेले. इतर दोन आरोपी आधीच तिथे हजर होते. मुलगी मदतीसाठी आरडाओरडा करू लागली पण त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्यांनी मुलीचे डोके दगडाने ठेचून हत्या केली.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही स्कॅन केले तेव्हा त्यांना एका फुटेजमध्ये मुलगी एका पुरुषासोबत रस्त्याने चालताना दिसली. मात्र, सीसीटीव्हीमध्ये आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता.

परिसरातील काही लोकांशी बोलल्यानंतर पोलिसांना आरोपीचे नाव मिथिलेश असल्याचे समजले. पोलिसांनी मिथिलेशचा माग काढला. पोलिसांसमोर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच, उर्वरित दोन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta Fine 25 Billion Dollars: डेटा प्रायव्हसी प्रकरणात 'मेटा'ला झटका! कोर्टाने ठोठावला 2.36 लाख कोटींचा दंड; सिलिकॉन व्हॅली हादरली

Salaulim Dam Affected People: 40 वर्षांपासून प्रलंबित साळावली धरणग्रस्तांचा प्रश्न सुटणार? मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Russian Woman Viral Video: 'पाणीपुरी नको!' म्हणत रशियन महिलेनं फिरवली पाठ; पण भेळपुरीची चव चाखताच म्हणाली, Wow.... पाहा व्हिडिओ

क्रीडा विश्वात मोठी खळबळ! भारतीय खेळाडूकडून हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ, पोलिसांकडून कारवाई

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

SCROLL FOR NEXT