Jain Temple Theft Dainik Gomantak
देश

Madhya Pradesh: गलती से मिस्टेक! माफी मागत चोराने परत केले मंदिरातील दागिने

मध्य प्रदेशातील लामटा येथे शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरात सोमवारी रात्री चोरी झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

चोरट्याने मंदिरातील लाखो रुपयांचे साहित्य व मौल्यवान वस्तू चोरी केल्या. मात्र, चोरट्याला चुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गलती से मिस्टेक झाल्याचे म्हणत त्याने साहित्य परत केले. ही घटना आहे, मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट ( Balaghat ) येथील जैन मंदिरातील. जैन मंदिरातून (Jain Temple) काही दिवसांपूर्वी चांदीच्या वस्तू चोरीला गेल्या होत्या. चोरट्याने एका पिशवीत चोरीच्या वस्तू भरून त्या परत केल्या व त्या पिशवीवर 'चुकून चोरी केली, मला माफ करा.' असा मजकूर लिहलेली एक चिठ्ठी चिकटवली.

घडलं असं की. मध्य प्रदेशातील लामटा येथे असलेल्या शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरात सोमवारी (दि.24) रात्री चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील मौल्यवान वस्तू चोरी केल्या, यात मंदिरातील चांदीच्या नऊ छत्र्या आणि इतर वस्तू होत्या. स्थानिक पोलिसांनी घटनेच्या माहितीवरून तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी चोरी प्रकरणातील आरोपींवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. तसेच, अनेक संशयितांची चौकशीही केली.

दरम्यान, परिसरातील काही लोक पाणी भरण्यासाठी नळाजवळ पोहोचले असताना त्यांना खड्ड्यात एक पिशवी आढळून आली. या पिशवीत काही चांदीच्या वस्तू दिसल्या. यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वस्तू जप्त केल्या. पोलिसांना जप्त केलेल्या या सामानासोबत एक चिठ्ठी आढळली. चोरट्याने या चिठ्ठीत चक्क चोरी केल्याची माफी मागितली होती. 'मंदिरातून चोरी केल्यानंतर मला खूप नुकसान झालं. माझ्याकडून चुकून चोरी झाली, मला माफ करा.' असं चोरट्याने या चिठ्ठीत लिहलं होते.

सापडेलेल्या वस्तू जैन मंदिरातील असल्याची शाहनिशा मंदिराच्या सदस्यांनी केली. पोलीस अद्याप चोरट्यांचा तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT