UNSC Dainik Gomantak
देश

दहशतवादाविरोधात जगाने एकत्र यावे; UNSC मध्ये भारताने व्यक्त केली प्रतिक्रिया

भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला (UNSC) सांगितले की, हे हल्ले जगाला दहशतवादाविरोधात एकजूट राहण्याची आणि दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांच्या विरोधात उभे राहण्याची वेळ आली आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूलमध्ये (Kabul) झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा तीव्र निषेध करत भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला (UNSC) सांगितले की, हे हल्ले जगाला दहशतवादाविरोधात एकजूट राहण्याची आणि दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांच्या विरोधात उभे राहण्याची वेळ आली आहे. गुरुवारी काबुलच्या विमानतळावर दोन आत्मघाती हल्लेखोर आणि बंदुकधाऱ्यांनी अफगाणांच्या जमावावर हल्ला केला, त्यात किमान 60 अफगाणी आणि 13 अमेरिकन सैनिक ठार झाले. मात्र, हल्ल्यात 100 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे.

संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी आणि सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष राजदूत टीएस तिरुमूर्ती यांनी गुरुवारी सांगितले की, "मी काबूलमधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. आम्ही या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो."

दहशतवादाविरोधात आणि दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांविरुद्ध एकत्र या

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (यूएनएससी) ब्रीफिंगमध्ये बोलताना तिरुमूर्ती म्हणाले की, काबूलमधील हल्ले "दहशतवादाविरोधात आणि दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांविरोधात एकत्र येण्याची जगाने एकत्र येण्याची गरज आहे.''

अफगाणिस्तानमधील इस्लामिक स्टेटशी संलग्न इस्लामिक स्टेट-खोरासान प्रांत (ISKP) ने काबूल विमानतळाबाहेर झालेल्या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी काबूल हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांच्या जीवनाचा बदला घेण्याचे वचन दिले आहे. बिडेन यांनी गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना सांगितले, "ज्यांनी हा हल्ला केला आणि अमेरिकेला हानी पोहचवण्याचा हेतू ठेवला आहे, हे लक्षात ठेवा की आम्ही तुम्हाला सोडणार नाही." हे आम्ही विसरणार नाही. आम्ही तुम्हाला पकडू आणि शिक्षा करू. मी माझ्या देशाचे हित आणि लोकांचे रक्षण करीन. ”

आम्ही 'जागा आणि वेळही निवड'

जो बायडन म्हणाले की जर काही कारणांवर विश्वास ठेवायचा असेल तर अमेरिकेला माहित आहे की या हल्ल्याचा आदेश देणारा इसिसचा नेता कोण होता. तो कुठेही असला तरी, त्याला मोठ्या लष्करी कारवाईशिवाय पकडण्याचे मार्ग शोधू. बायडन यांनी असेही म्हटले आहे की त्यांनी लष्करी कमांडरांना आयएसआयएस-के वर हल्ल्याची योजना करण्यास सांगितले आहे. "आता आम्ही आमच्या निवडलेल्या ठिकाणी आणि वेळेवर उत्तर देऊ,"

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT