The Girls who slaps Pakistan in UNGA Sneha Dubey's Goa Connection  Dainik Gomantak
देश

UN मध्ये पाकिस्तनला खडसावणाऱ्या स्नेहा दुबेचं गोवा कनेक्शन

पाकिस्तान हा आग विझवणाऱ्याच्या वेशात आग लावणारा देश आहे असे वक्तव्य स्नेहा दुबेनं (Sneha Dubey) केलं आहे

दैनिक गोमन्तक

पाकिस्तान (Pakistan) हा आग विझवणाऱ्याच्या वेशात आग लावणारा देश आहे असे वक्तव्य करून पाकिस्तानमध्ये मूळ धरलेल्या दहशतवादामुळे (Terrorists) भारतच नव्हे तर सारे जग संकटात आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण (UNGA) सभेत सांगणारी तरुण महिला सेक्रेटरी स्नेहा दुबे (Sneha Dubey) हिचा जन्म गोव्यातील आहे. त्यामुळे गोव्यातून स्नेहावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (The Girls who slaps Pakistan in UNGA Sneha Dubey's Goa Connection)

स्नेहाने पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इम्रान खान यांनी काश्मीरसंबंधात उपस्थित केलेल्या मुद्द्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुख्य धारेतील प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमावर सध्या स्नेहा दुबेच्या नावाची जोरदार चर्चा चालू आहे. स्नेहा दुबे ही 2012 च्या आयएफएस बॅचच्या अधिकारी असून तिचा जन्म व संपूर्ण शालेय शिक्षण गोव्यात झाले. शालेय शिक्षण घेत असतानाच वयाच्या बाराव्या वर्षापासून तिने आयएफएस अधिकारी बनण्याचे स्वप्न जोपासले होते. जागतिक घडामोडी व भूगोल या विषयांची तिला विशेष आवड होती. पुढील शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज व दिल्लीस्थित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) घेतल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात तिने युपीएससी परीक्षेत यश मिळवले. तिची बौद्धिक जडणघडण गोव्यात झाली असून ती गोमंतकीय युवक युवतींसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

पाकिस्तानसह सर्व शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवण्याची भारताची इच्छा आहे. भारताविरोधात सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानच्या भूमीचा वापर होऊ न देण्यासाठी प्रामाणिकपणाने पावले उचलण्याची जबाबदारी पाकिस्तानची आहे. असे आपल्या ‘यूएन’ च्या आमसभेत खडसावले होते .

सरकारी सेवेमध्ये रुजू झालेल्या स्नेहा या त्यांच्या कुटुंबातील पहिल्याच सदस्या आहेत. त्यांचे वडील एका खासगी बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करतात तर आई शिक्षिका आहे. स्नेहा यांची 2012 मध्ये स्नेहा पहिली नियुक्ती परराष्ट्र मंत्रालयामध्ये झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT