The fan gallery collapsed during a football match Dainik Gomantak
देश

फुटबॉल सामन्यादरम्यान प्रेक्षकांची गॅलरी कोसळली; व्हिडीओ व्हायरल

यामध्ये 200 जण जखमी

दैनिक गोमन्तक

The fan gallery collapsed during a football match: आपल्या देशात खेळांचे विशेष महत्व आहे. खेळाचे सामने पाहण्यासाठी चाहते नेहमी गर्दी करत असतात. अश्याच एका सामन्यादरम्यान प्रेक्षकांची गॅलरी कोसळली आणि त्यात अनेक प्रेक्षक जखमी झाले आहेत. फुटबॉलचा सामना (Football) पाहण्यासाठी आलेल्या शेकडो प्रेक्षकांवर गॅलरी कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत तब्बल 200 जण जखमी झाले आहेत. (The fan gallery collapsed during a football match 200 injured)

केरळमधील (Kerala) वंदूर जिल्ह्यातील मलाप्पूरमनजीक असणाऱ्या पुंगूड गावातील सदर घटना आहे. यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले असून सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गॅलरी कोसळतानाचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर तो तूफान व्हायरल होत आहे.

शनिवारी पुंगूड येथे फुटबॉलच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फुटबॉल प्रेमींची संख्या पाहता, याठिकाणी प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी गॅलरी तयार करण्यात आली होती. सामना सुरू असताना अचानक ही गॅलरी कोसळली.

दरम्यान, आयोजकांनी ताबडतोब सर्वांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आणि जखमी झालेल्या चाहत्यांवर उपचार सुरू करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

Asian Games 2026: ब्लॉकबस्टर फायनल होणार! श्रीलंकेला 124 धावांनी धूळ चारत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश, आता जेतेपदासाठी पाकिस्तानशी होणार 'कांटे की टक्कर'

Success Motivation: 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..!'; अपयश आलं तरी थांबू नका, प्रयत्नांची साथच यशाचा मार्ग दाखवते

Mental Health Rehabilitation: मानसिक आजारावर उपचार झाले, पण पुढे काय?; रुग्णाच्या पुनर्वसनासोबत कुटुंबालाही आधाराची गरज

IND vs WI: गुवाहाटीत महापराक्रम! 55 वर्षांच्या वनडे क्रिकेट इतिहासात कधीही घडलं नाही, ते घडलं; भारत-वेस्टइंडीज सामना ठरला क्रिकेट विश्वातील 'सुवर्णपान'

SCROLL FOR NEXT