Train Dainik Gomantak
देश

मोदी सरकारचा मोठा निर्णय, 657 ट्रेन केल्या रद्द

केंद्र सरकारने कोळशाच्या वॅगनसाठी आणि त्यांच्या जलद हालचाली सुनिश्चित करण्यासाठी 657 गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

केंद्र सरकारने कोळशाच्या वॅगनसाठी आणि त्यांच्या जलद हालचाली सुनिश्चित करण्यासाठी 657 गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांमध्ये मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे. एकूण 533 कोळसा रेक ड्युटीवर लावण्यात आले आहेत. ऊर्जा क्षेत्रासाठी काल 437 रेक लोड करण्यात आले. या क्षेत्रासाठी 16.20 लाख टन कोळसा लोड करण्यात आला आहे.

केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या (CEA) ताज्या अहवालानुसार, 27 एप्रिलपर्यंत देशातील 147 थर्मल पॉवर प्लांटमध्ये 24 टक्क्यापेक्षा कमी कोळशाचा साठा शिल्लक आहे. सीईएच्या अहवालात असेही म्हटले आहे की, या प्लांट्समध्ये 57,033 हजार टन कोळशाचा साठा असायला हवा परंतु त्यांच्याकडे फक्त 13,912 हजार टन कोळसा शिल्लक आहे. देशातील बहुतांश भागात कडक उन्हामुळे विजेच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. गुरुवारी विजेची मागणी 204.65 गिगावॅट इतकी विक्रमी पातळी गाठली होती.

वीज कपातीवरुन काँग्रेसने केंद्रावर निशाणा साधला

देशातील अनेक राज्यातील वीज कपातीवरुन काँग्रेस (Congress) पक्षाने शुक्रवारी केंद्र सरकारवर (Central Governments) निशाणा साधला. येत्या काळात विजेची मागणी आणखी वाढेल. ही परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांच्याकडे योजना आहे का? कोळशाच्या टंचाईची जबाबदारी केंद्र राज्यांवर ढकलत असल्याचा आरोपही पक्षाने केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT