The Bhagavad Gita will be included in the curriculum in schools in Karnataka Dainik Gomantak
देश

कर्नाटकातील शाळांमध्ये अभ्यासक्रमात होणार भगवद्गीतेचा समावेश

राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांची माहिती

दैनिक गोमन्तक

Bhagavad Gita in School Syllabus: भगवद्गीता हा आपल्या भारतीय संस्कृतीमधला अत्यंत महत्वाचा ठेवा आहे. मुलांमधील सांस्कृतिक मूल्ये लोप पावत असल्याने ते थांबविण्यासाठी कर्नाटकमधील शाळांत भगवद्गीतेचे पाठ शिकविण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. शालेय अभ्यासक्रमात नीतिशास्त्र शिकविले जावे, अशी अनेक नागरिकांची मागणी आहे, असे राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी सांगितले. (The Bhagavad Gita will be included in the curriculum in schools in Karnataka)

कर्नाटकबरोबरच गुजरात सरकारही शाळांमध्ये भगवद्गीतेचा शालेय अभ्यासक्रमात (School Syllabus) समावेश करण्याचे नियोजन करत आहे. त्यानंतर आता कर्नाटकच्या शिक्षणमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. पण तसे करण्याआधी शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्नाटकमधील शाळांत नीतिशास्त्र शिकवायचे की नाही, याचा निर्णय मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी चर्चा केल्यानंतर घेण्यात येणार आहे असे त्यांनी संगितले.

शाळांमध्ये यापूर्वी नीतिशास्त्राची एक तासिका घेतली जायची. ती प्रत्येक आठवडय़ात असायची. त्यात रामायण, महाभारत यांच्यातील कथांवर आधारित धडे दिले जायचे. आता भगवद्गीतेचा अभ्यासक्रमात समावेश केल्याने विद्यार्थ्यांच्या नितीमत्तेत भर पडणार असल्याचे मत नागेश यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT