Terror Funding Case: NIA raids 45 locations in Jammu and Kashmir Dainik Gomantak
देश

Terror Funding Case: NIA ची मोठी मोहीम; 45 ठिकाणी छापेमारी

NIAने 31 जुलै रोजी जम्मू-काश्मीरमधील 15 ठिकाणी छापे टाकत लष्कर-ए-मुस्तफा (LEM) या दहशतवादी संघटनेशी संबंधित दोघांना अटक केली होती.

दैनिक गोमन्तक

राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने (NIA) जम्मू -काश्मीरमधील (Jammu and Kashmir) दहशतवाद्यांना (Terrorists) होणाऱ्या फंडींग प्रकरणात कारवाई सुरु केली आहे. एनआयएकडून आज जम्मू –काश्मीरमधील अनंतनागमध्ये आणि इतर ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत. छापे टाकण्यात आले आहेत. एनआयएसह विविध सुरक्षा संस्थांनी दहशतवाद्यांना समर्थन करणाऱ्यांविरुद्ध सुरु केलेली ही एक महत्वाची आणि मोठी कारवाई असुन, जुलै महिन्याच्या शेवटीही अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. यादरम्यान एका दहशतवाद्याला अटकही करण्यात आली होती. (Terror Funding Case: NIA raids 45 locations in Jammu and Kashmir)

एनआयएने 31 जुलै रोजी जम्मू-काश्मीरमधील 15 ठिकाणी छापे टाकत लष्कर-ए-मुस्तफा (एलईएम) या दहशतवादी संघटनेशी संबंधित दोघांना अटक केली होती. छापेमारी दरम्यान, मोबाईल फोन, पेन ड्राइव्ह, वापरलेले बुलेट कियोस्क, दगडफेकीच्या वेळी वापरलेले प्लास्टिक चे मुखवटे आणि हस्तलिखित जिहादी साहित्यासह डिजिटल उपकरणे एनआयएने जप्त केली होती.

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार "एनआयएने जम्मू -काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलासह (CRPF) शोपियान, अनंतनाग आणि जम्मू जिल्ह्यातील नऊ ठिकाणी छापा टाकला. छाप्यानंतर, आरोपी व्यक्ती - इरफान अहमद (अनंतनाग) याला अटक करण्यात आली. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासात तो इतर अटक आरोपींच्या संगनमताने दहशतवादी कारवाया करण्याच्या कटात सहभागी असल्याचे उघड झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

SCROLL FOR NEXT