Accident In Himachal Pradesh
Accident In Himachal Pradesh Dainik Gomantak
देश

Himachal Road Accident| कुल्लूमध्ये पर्यटकांनी भरलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण अपघात; 7 ठार, 10 जखमी

दैनिक गोमन्तक

हिमाचलच्या कुल्लू जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात 7 पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यात 10 जण जखमी झाले. औट लुहरी राष्ट्रीय महामार्ग 305 वर घियागीजवळ हा अपघात झाला. जिथे पर्यटकांनी भरलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला अपघात झाला. कारमध्ये बसलेल्या पर्यटकांपैकी 7 जण ठार तर 10 जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी स्थानिक लोकांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्यात आहेत.

(Accident In Himachal Pradesh)

कुल्लूचे एसपी गुरदेव सिंह यांनी सांगितले की, काल रात्री साडेआठ वाजता कुल्लूमधील बंजार खोऱ्यातील घियागी भागात NH-305 वर एक पर्यटक वाहन कठड्यावरून पडल्याने 7 जण ठार झाले आणि 10 जण जखमी झाले. 5 जखमींना कुल्लूच्या झोनल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असून 5 जणांवर बंजार येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

त्याचवेळी आमदार बंजार सुरेंद्र शौरी यांनीही स्थानिक लोकांना जखमींना वाचवण्याचे आवाहन केले होते. याबाबत आमदार सुंदर छोरी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ मेसेजद्वारे घटनेची माहिती लोकांना दिली. कुल्लूचे एसपी गुरुदेव शर्मा यांनी सांगितले की, घियागीमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात झाला आहे. ते म्हणाले की, पोलीस पथक आणि स्थानिक लोक घटनास्थळी बचावकार्य करत आहेत. ते म्हणाले की, सध्या पाच मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून आठ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. पोलीस पथक घटनास्थळी तपास करत असून मृतांना शवविच्छेदनासाठी बंजारा रुग्णालयात नेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

SCROLL FOR NEXT