DGP Anjani Kumar Suspended Dainik Gomantak
देश

Telangana Assembly Election Result 2023: तेलंगणाचे डीजीपी निलंबित, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निकालादरम्यान निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.

Manish Jadhav

Telangana Assembly Election Result 2023: तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निकालादरम्यान निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याचे पोलीस प्रमुख अंजनी कुमार यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी तेलंगणाच्या डीजीपीला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. डीजीपींबाबत निवडणूक आयोगाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या, त्यामुळे निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, तेलंगणाचे पोलीस महासंचालकांनी संजय जैन, राज्य पोलीस नोडल अधिकारी, तेलंगणा आणि महेश भागवत, (नोडल अधिकारी) यांच्यासमवेत तेलंगण विधानसभेच्या चालू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीतील उमेदवार रेवंत रेड्डी यांची हैदराबाद येथे भेट घेतली होती. यानंतर या भेटीबाबत आक्षेप घेण्यात आला आणि आता निवडणूक आयोगाने त्यांना याप्रकरणी निलंबित केले.

दुसरीकडे, राज्याच्या स्थापनेनंतर सलग दहा वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या केसीआर यांनी आपला पराभव मान्य केला आहे. त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. निवडणुकीत पिछाडीवर पडल्यानंतर केसीआर यांचे पुत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री केटीआर यांनी ट्विट केले की, भारत राष्ट्र समितीला सलग दोन वेळा संधी दिल्याबद्दल मी तेलंगणातील जनतेचे आभार मानतो. ते पुढे म्हणाले की, आजच्या निकालाने मी दु:खी नाही, पण आमच्या अपेक्षेप्रमाणे न झाल्याने मी नक्कीच निराश आहे. या पराभवातून आम्ही नक्की धडा घेऊ आणि परत येऊ. विजयाबद्दल काँग्रेस पक्षाचे अभिनंदन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Honda 0 Series EV: होंडाची EV सेगमेंटमध्ये 'धमाल'! 'झीरो सीरिज'मधील 'ही' दमदार SUV लवकरच भारतात होणार लॉन्च; टाटा नेक्सॉनला देणार कडवी टक्कर

Viral Video: दूध सांडले, पाणी सांडले, मार मात्र एकालाच! आई-मुलाच्या वादाचा मजेदार VIDEO व्हायरल, नेटकऱ्यांनीही घेतली मजा; म्हणाले...

Cricket Controversy: क्रीडा विश्वात खळबळ! ब्रॉडच्या वडिलांनी ICC आणि BCCI वर केला गंभीर आरोप, 'टीम इंडिया'बद्दल केला मोठा खुलासा

IND vs AUS Head To Head Record: टी-20 चा खरा किंग कोण? भारत-ऑस्ट्रेलिया महासंग्राम बुधवारपासून! काय सांगतो हेड-टू-हेड रेकॉर्ड?

Goa Ration Shop: गोव्यातील रेशन दुकानदारांसाठी खूशखबर! 1 कोटींचे थकीत कमिशन मिळणार; केंद्राकडून निधी मंजूर

SCROLL FOR NEXT