Telangana CM Controversial Statement Dainik Gomantak
देश

Telangana CM Controversial Statement: 'प्रभु श्री राम श्रीमंतांचे, तर भगवान शिव गरिबांचे देव', काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं खळबळ; भाजप आक्रमक VIDEO

Lord Rama And Lord Shiva Political Row: तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रेवंत रेड्डी यांनी भगवान श्रीराम आणि भगवान शिव यांच्याबाबत एक अत्यंत खळबळजनक विधान केले.

Manish Jadhav

Telangana CM Revanth Reddy Controversial Statement: तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रेवंत रेड्डी यांनी भगवान श्रीराम आणि भगवान शिव यांच्याबाबत एक अत्यंत खळबळजनक विधान केले. दिल्लीतील एका मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना त्यांनी देवांमध्येच श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव केला.

भगवान राम हे श्रीमंतांचे दैवत असून भगवान शिव हे गरिबांचे देव आहेत, असे ते म्हणाले. एवढेच नव्हे तर आम्ही काँग्रेसवाले शिवाची भक्ती करतो आणि भारतीय जनता पक्ष रामाची पूजा करतो, असे सांगत भाजपने रामाला राजकीय स्वार्थासाठी वापरल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

आपल्या वक्तव्याचे समर्थन करताना रेवंत रेड्डी यांनी द्रविड आणि आर्य संस्कृतीचा दाखला देत उत्तर आणि दक्षिण भारत असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दक्षिण भारतात शिवाची आणि उत्तर भारतात रामाची पूजा जास्त होते, असा दावा त्यांनी केला.

भाजप (BJP) ही श्रीमंतांची पार्टी असल्यामुळेच ते फक्त 'जय श्री राम'चा नारा देतात, पण कधीही 'हर हर महादेव' म्हणत नाहीत, असे ते म्हणाले. सनातन संस्कृतीतील दोन प्रमुख देवतांना अशा प्रकारे वर्ग आणि भौगोलिक सीमांमध्ये वाटल्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले.

या विधानावर भाजपने अत्यंत आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्री रेड्डी यांच्यावर कडाडून टीका केली. केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांनी पलटवार करताना म्हटले की, जे मुख्यमंत्री आधी तुष्टीकरणाची भाषा बोलत होते, ते आता राजकारणासाठी थेट भगवान राम आणि भगवान शिव यांच्यात फूट पाडत आहेत.

हिंदू सनातन धर्मात विष्णू आणि शिव यांच्यात कोणतेही भेद नसून ते एकाच शक्तीची दोन रुपे आहेत. निवडणुकीच्या काळात मतांसाठी देवांच्या नावाने शपथ घेणारे रेवंत रेड्डी आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी देव आणि धर्माचा वापर करुन समाजात जाती आणि वर्ग भेद करतायेत, अशी घणाघाती टीका भाजपने केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IT ची हाय-फाय नोकरी सोडली, बंगळुरुत चालवते रॅपिडो ऑटो, कॉर्पोरेट नोकरीपेक्षा कमावते जास्त पैसे; आईसाठी तरुणीनं उचललं मोठं पाऊल

पाकिस्तानात सुरक्षेची ऐशीतैशी! दरोडेखोरांनी थेट खेळाडूंच्या बसलाच केलं टार्गेट; बंदुकीचा धाक दाखवत पैशांची मागणी अन् मारहाण

Goa Paddy Farming: पावसाने आणखी दडी मारली तर भातशेती धोक्यात; कणसे धरण्याच्या काळात कृषी संचालकांचा इशारा

लोबोंच्या तक्रारीनंतर दोघांना अटकपूर्व जामीन; ग्लेन, डेरिक यांना न्यायालयाचा दिलासा

Kasaarvarne School Vandalism: कासारवर्णेच्या शाळेत तोडफोड; खिडक्यांच्या काचा फोडल्या, नळाची जोडणीही तोडली, पोलिसांत तक्रार

SCROLL FOR NEXT