Suryakumar Yadav Dainik Gomantak
देश

Suryakumar Yadav: अचानक काय झालं? सूर्यकुमार यादवचा हॉस्पिटलमधील फोटो व्हायरल, स्वतः पोस्ट करत दिली माहिती

Suryakumar Yadav Hernia Surgery: स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाचा भाग नाहीय. तो शेवटचा मुंबई टी-२० लीगमध्ये खेळताना दिसला होता.

Sameer Amunekar

स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाचा भाग नाहीय. तो शेवटचा मुंबई टी-२० लीगमध्ये खेळताना दिसला होता. आता जर्मनीतील म्युनिक येथे त्याची स्पोर्ट्स हर्नियाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. सूर्या हा भारतीय टी-२० संघाचा कर्णधार आहे आणि तो जलद गतीने धावा काढण्यासाठी ओळखला जातो.

सूर्यकुमार यादवने पोस्ट करत दिली माहिती

सूर्यकुमार यादवने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले की, लाइफ अपडेट – पोटाच्या उजव्या खालच्या भागात स्पोर्ट्स हर्निया झाल्यानं सर्जरी झाली आहे. मला हे सांगण्यास आनंद होत आहे की शस्त्रक्रियेनंतर मी बरा होण्याच्या मार्गावर आहे. मी पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहे.

सूर्यकुमार यादव हा भारतीय टी-२० आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात सहभागी होण्याची अपेक्षा आहे. सूर्या हा स्फोटक फलंदाजीचा मास्टर आहे आणि त्याच्या भात्यात विरोधी गोलंदाजांना उद्ध्वस्त करणारे प्रत्येक बाण आहे.

मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात फटके मारण्याची त्याची क्षमता आहे. त्याने २०२१ मध्ये भारतीय संघासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर, त्याने भारतासाठी ८३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण २५९८ धावा केल्या, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून चार शतके आणि २१ अर्धशतके झाली.

सूर्यकुमार यादवने भारताकडून कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्येही खेळले आहे. परंतु टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या तुलनेत तो या दोन्ही स्वरूपात तितका यशस्वी झाला नाही. त्याने ३७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७७३ धावा केल्या आहेत. याशिवाय, तो एका कसोटीत फक्त ८ धावा करू शकला आहे. या दोन्ही स्वरूपात त्याच्या नावावर एकही शतक नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cordelia Cruise: पश्चिम किनारपट्टीवरील सफरनामा! कोची ते गोवा करा 5 दिवसांची 'ओशन ड्रीम्स' सफर; कोर्डेलिया क्रूझचं नवं पॅकेज

Goa: वेटरकडून हॉटेलच्या मालकीणीवर बलात्कार, तोंडावर उशी ठेऊन दिली जीवे मारण्याची धमकी; आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

Goa Schools: राज्यातील शाळांमध्ये आता 'वॉटर ब्रेक'! विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी मिळणार 2 मिनिटांचा वेळ; शिक्षण खात्याचा निर्णय

ED Goa: रोहन हरमलकरांचा पाय खोलात; जमीन हडप प्रकरणी ईडीने 212 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता केली जप्त

Goa Assembly: नोकऱ्या नसल्याने तरुणाई व्यसनांच्या विळख्यात... युरी आलेमाव यांचा गंभीर आरोप; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT