Tamil Nadu Accident Twitter/ @ANI
देश

Tamil Nadu Accident: तामिळनाडूत भीषण अपघात, बस दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू

Tamil Nadu Accident: तामिळनाडूतील निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरजवळ पर्यटकांची बस दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला.

Manish Jadhav

Tamil Nadu Accident: तामिळनाडूतील निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरजवळ पर्यटकांची बस दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन चालकांसह 59 प्रवाशांना घेऊन जाणारी टूरिस्ट बस शनिवारी संध्याकाळी कुन्नूरहून तेनकासीला जात असताना दरीत कोसळली. पर्यटक उटी येथे पर्यटनासाठी आले होते आणि घरी परतत होते.

बस दरीत कोसळली

दरम्यान, अचानक बस दरीत कोसळली. अपघाताची बातमी समजताच स्थानिक अधिकारी आणि बचाव कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. आठ प्रवाशांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.

दुसरीकडे, तामिळनाडूचे (Tamil Nadu) मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

मृतांमध्ये चार महिला, एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे

पोलिसांकडून (Police) मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये चार महिला आणि एका अल्पवयीनाचा समावेश आहे. पीडित तेनकासी जिल्ह्यातील कदयम येथील रहिवासी असून ही घटना घडली तेव्हा ते घरी परतत होते. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस खोल दरीत कोसळली असल्याचे सांगितले जात आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची भरपाई

स्थानिक लोक, पोलीस, अग्निशमन आणि बचाव कर्मचारी पीडितांना मदत करण्यासाठी आणि जखमींना वाचवण्यासाठी धावले. जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी जवळच्या कोईम्बतूरला हालवण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 13 September 2026: बुध-चंद्राचा महासंग्राम! आज 'या' 3 राशींवर ओढवणार मोठे संकट? पैशांचे व्यवहार करताना सावध राहा

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

SCROLL FOR NEXT