Shocking News Dainik Gomantak
देश

Shocking News: अजब प्रकार...! गुजरातमध्ये मृत व्यक्ती अचानक झाला जिवंत, डॉक्टरही हैराण; कुटुंबीय म्हणाले, "हा देवाचा चमत्कार"

Gujrat News: गुजरातमधील सुरतमध्ये घडलेल्या एका अद्भुत घटनेने डॉक्टरांसह सर्वसामान्य नागरिकांनाही थक्क केले आहे.

Sameer Amunekar

गुजरातमधील सुरतमध्ये घडलेल्या एका अद्भुत घटनेने डॉक्टरांसह सर्वसामान्य नागरिकांनाही थक्क केले आहे. सुरतच्या नवीन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान एका रुग्णाचे हृदयाचे ठोके पूर्णपणे थांबले. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न करूनही त्याला वाचवू शकले नाहीत. त्यामुळे वैद्यकीय टीमने त्या रुग्णाला अधिकृतरीत्या मृत घोषित केले. पण फक्त १५ मिनिटांतच असा चमत्कार घडला की डॉक्टरही थक्क झाले. मृत घोषित केलेल्या रुग्णाचे हृदय पुन्हा धडधडू लागले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रुग्णाचे नाव राजेश पटेल (वय ४५) असून तो अंकलेश्वरचा रहिवासी आहे. तो काही दिवसांपासून गंभीर हृदयविकाराने त्रस्त होता आणि त्याच्यावर सुरत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

उपचारादरम्यान अचानक त्याचे हृदय बंद पडले. ईसीजी मॉनिटरवर सरळ रेषा दिसल्याने डॉक्टरांनी सीपीआर आणि औषधोपचाराचे सर्व प्रयत्न करूनही त्याला जिवंत करू शकले नाहीत. काही वेळाने डॉक्टरांनी अधिकृतरीत्या त्याला मृत घोषित केले.

१५ मिनिटांनंतर मात्र घडलेले दृश्य सर्वांनाच चकित करणारे होते. अचानक ईसीजी मॉनिटरवर पुन्हा हृदयाचे ठोके दिसू लागले. राजेशचे शरीर थोडे हालू लागले आणि तो श्वास घेऊ लागला. हे पाहून वैद्यकीय टीमने तत्काळ त्याच्यावर पुन्हा उपचार सुरू केले आणि त्याला आयसीयूमध्ये हलवण्यात आले.

सुरत सिव्हिल हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) डॉ. उमेश चौधरी यांनी सांगितले, “माझ्या ३० वर्षांच्या वैद्यकीय सेवेत मी अशी घटना पहिल्यांदाच पाहिली आहे. सरळ रेषा दाखवणारा रुग्ण पुन्हा श्वास घेऊ लागणे ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. राजेशची प्रकृती अजूनही गंभीर असली तरी तो सध्या आयसीयूमध्ये आहे.”

राजेशच्या कुटुंबाने या घटनेला दैवी चमत्कार म्हटले आहे. त्याचा भाऊ मेला पटेल म्हणाला, “डॉक्टरांनी माझ्या भावाला मृत घोषित केले होते. आम्ही सर्वजण रडत होतो. पण काही वेळाने तो पुन्हा श्वास घेऊ लागला. हे फक्त देवाच्या कृपेने शक्य झाले.”

रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, राजेशची प्रकृती सध्या स्थिर आहे, पण पुढील काही दिवस त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. ही घटना सुरतमध्ये “मृत्यूवर मात करणारा चमत्कार” म्हणून सध्या चर्चेचा प्रमुख विषय ठरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT