Supreme Court Dainik Gomantak
देश

Sulli Deals अ‍ॅप बनवणाऱ्या कंपनीने अनेक गुन्हे केले आहेत': Supreme Court

Supreme Court: सुल्ली डील्स अ‍ॅप बनवणाऱ्या कंपनीने एफआयआर एकत्र करण्यासाठी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तीन राज्यांना नोटीस बजावली.

दैनिक गोमन्तक

Sulli Deals App: सुल्ली डील्स अ‍ॅप बनवणाऱ्या कंपनीने एफआयआर एकत्र करण्यासाठी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तीन राज्यांना नोटीस बजावली.त्याचवेळी न्यायालयाने आरोपींविरुद्धच्या तपासाला स्थगिती देण्यास नकार दिला. न्यायमूर्ती एस के कौल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिल्ली, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशला नोटीस जारी करताना, आरोपी बीसीए पदवीधर ओंकारेश्वर ठाकूरला दिलासा देणे शक्य आहे का, असा प्रश्न विचारला. तोही त्याच्यावर वेगवेगळ्या कृत्यांसाठी वेगवेगळे आरोप असताना. त्याच्यावर वेगवेगळ्या गुन्ह्यांचा आरोप आहे.

दरम्यान, जुलै 2021 मध्ये दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. 'GitHub' या इंटरनेट प्लॅटफॉर्मवर 'सुल्ली डील ऑफ द डे' नावाचा एक कार्यक्रम तयार करण्यात आला होता. जिथे अनेक मुस्लिम महिलांचे फोटो त्यांच्या संमतीशिवाय घेतले गेले होते. कथितरित्या ऑनलाइन लिलावासाठी हे फोटो अपलोड करण्यात आले होते.

दुसरीकडे, या वर्षी जानेवारीमध्ये दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) बुल्लीबाई अ‍ॅपच्या संदर्भात आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये आरोप करण्यात आला होता की, 'या अ‍ॅपच्या माध्यमातून मुस्लिम महिलांचा अपमान करण्याचा हेतू होता.' यातच आता ओंकारेश्वर ठाकूर नावाच्या व्यक्तीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली (Delhi), महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशकडून (Uttar Pradesh) उत्तरे मागितली आहेत. ठाकूर यांनी सुल्ली डील्स अ‍ॅपशी संबंधित उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात दाखल केलेल्या एफआयआर किंवा या संदर्भात देशात दाखल केलेल्या तक्रारी रद्द करण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT