Supreme Court Dainik Gomantak
देश

Supreme Court: ‘सर्वच धर्मांतरे बेकायदा नाहीत’ सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टच सांगितले

नवीन कायद्याच्या बाबतीत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

दैनिक गोमन्तक

Supreme Court: विवाह किंवा धर्मांतरावर घटनेनुसार कोणतेही बंधन नाही व सर्वच धर्मांतरे बेकायदा म्हणता येणार नाहीत असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनाच त्याबाबत माहिती द्यावी असे आपण म्हणू शकतो, असे न्यायाधीश एम. आर. शाह आणि न्या सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठाने सांगितले.

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या निकालाच्या आव्हान याचिकेवरील या प्रकरणी 7 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. नवीन कायद्याच्या बाबतीत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

सध्या 60 दिवस आधी पूर्वसूचना न देता अन्य धर्म स्वीकारणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार नाही. विवाह किंवा धर्मांतरावर घटनेनुसार बंधन नाही हे सर्वोच्च न्यायालयाने म्हणल्यामुळे याबाबत सर्वत्र चर्चा होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'झुरळ' शब्दाने भडकवला बेरोजगारांचा वणवा! 'कॉक्रोच जनता पार्टी'ने हादरवली दिल्ली

फेब्रुवारीतील इशारा ऐकला असता तर... सरकारवर नामुष्कीची आणि लाखो मुलांच्या जीव टांगणीला लागण्याची वेळ आली नसती; CBSE चा 'महा'घोटाळा चव्हाट्यावर!

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

SCROLL FOR NEXT