Sonia Gandhi & Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस नेत्यांची उद्या शिखर बैठक

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसच्या शिखर समितीची उद्या बैठक होत आहे.

दैनिक गोमन्तक

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसच्या शिखर समितीची उद्या बैठक होत आहे. रविवारी दुपारी चार वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक अशा वेळी होत आहे, जेव्हा शुक्रवारी रात्री काँग्रेसमधील (Congress) असंतुष्ट गट असलेल्या G-23 च्या काही नेत्यांची बैठक झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांच्या घरी झालेल्या बैठकीला मनीष तिवारी आणि इतर कॉंग्रेस नेते उपस्थित होते. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये काँग्रेसला फारसा काही करिष्मा दाखवता आला नाही, तर पंजाबमध्ये खराब कामगिरीने सत्ता गमवावी लागली आहे.

दरम्यान, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. पाच राज्यांतील काँग्रेसचा दारुण पराभव पाहता ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका सप्टेंबरमध्ये प्रस्तावित आहेत.

तसेच, काँग्रेसच्या पराभवानंतर केरळचे खासदार शशी थरुर यांच्यासह अनेक नेत्यांनी याआधीच वरिष्ठ पातळीवर बदलांची मागणी केली आहे. मात्र, कर्नाटकातील ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि डीके शिवकुमार यांनी गांधी कुटुंबावर विश्वास व्यक्त केला आहे. पराभवानंतर यूपी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनीही पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे, यूपी काँग्रेसचे इलेक्ट्रॉनिक मीडिया समन्वयक झीशान हैदर यांची नेतृत्वाविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: लाईक्स आणि व्ह्यूजसाठी जीवाशी खेळ! नदीच्या पुलावर लटकून 'तो' करतोय स्टंट, थरारक व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले...

Monsoon Withdrawal: अच्छा तो हम चलते हैं! मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु; गोव्यात तीन दिवस यलो अलर्ट

Taliban Attack Video: लाँग रेंजवरुन अचूक निशाणा साधत केला खेळ खल्लास; 40 पाकिस्तानी जवान ठार; तालिबानी संघटनेचा धडकी भरवणारा व्हिडिओ पाहा

katrina kaif Pregnant: "ही तर 2 वर्षांपासून गरोदर" विकी-कतरीनाची 'गुड न्यूज' चर्चेत, नोव्हेंबरमध्ये पाळणा हलणार?

ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अजहरच्या कुटुंबीयांचे तुकडे झाले; 'जैश'च्या टॉप कमांडरने जाहीरपणे केलं मान्य Watch Video

SCROLL FOR NEXT