Online education: Students  Dainik Gomantak
देश

Online Education: कर्नाटकातील मुले गोव्याच्या हद्दीत

कर्नाटकातही शिक्षणाला (Online Education) ‘नेट’ मिळेना!

दैनिक गोमन्तक

मोबेईल नेटवर्कची समस्या केवळ गोव्यातच नाही तर कर्नाटकाच्या सीमावर्ती भागातही आहे. घाटमाथ्यावरील विद्यार्थी गोव्याच्या हद्दीत येऊन ऑनलाईन शिक्षणासाठी शर्थ करीत असल्‍याचे दिसून येत आहे.

गोव्यात टॉवरअभावी नेटवर्कची समस्या सगळीकडे आहे. त्याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत असून त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. गोव्यात ही स्थिती असताना शेजारील कर्नाटक राज्यातील सीमेलगतच्या अनेक गावांची स्थितीही अशीच आहे. घाटमाथ्यावरील चोर्ला, कणकुंबीसह अनेक गावांतील विद्यार्थी मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याच्या कारणास्तव गोव्याच्या हद्दीत जंगल टेकड्यांवर येऊन बसलेले दिसतात.

कोविड महामारीमुळे दोन्ही राज्यांत शाळा बंद आहेत. ऑनलाईन वर्ग सुरू असले तरी नेटवर्कची समस्या सगळीकडे सारखीच आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. नेटवर्क मिळावे यासाठी कर्नाटकातील विद्यार्थी चक्क गोव्याच्या हद्दीतील सुर्ल आणि चोर्ला घाटापर्यंत येत आहेत. जंगली प्राण्यांचा वावर असलेल्या टेकड्यांवर हे विद्यार्थी झाडांखाली मोबाईल हातात घेऊन ऑनलाईन अभ्यास करताना दिसतात. गोव्यातील अनेक दुर्गम गावातही अशीच स्थिती आहे. १४४ टॉवर्सना सरकारने जागा उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिल्याने आगामी काळात ही समस्या सुटणार असली तरी सध्या विद्यार्थी मोठ्या जोखमीने शिक्षण घेत आहेत.

कर्नाटकातील मुले गोव्याच्या हद्दीत

अभ्यासासाठी मोबाईलचे नेटवर्क मिळावे यासाठी कर्नाटकातील विद्यार्थी चक्क गोव्याच्या हद्दीतील सुर्ल आणि चोर्ला घाटापर्यंत येत आहेत. जंगली प्राण्यांचा वावर असलेल्या टेकड्यांवर हे विद्यार्थी झाडांखाली मोबाईल हातात घेऊन ऑनलाईन अभ्यास करताना दिसतात. गोव्यातील अनेक दुर्गम गावातही अशीच स्थिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT