IIT Madras
IIT Madras Dainik Gomantak
देश

IIT Madras मध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या, महिन्याभरात दुसरी घटना

Manish Jadhav

IIT Madras: आयआयटी-मद्रासमध्ये बीटेकच्या तृतीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने मंगळवारी आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितले की, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगचा 20 वर्षीय विद्यार्थी, मूळचा आंध्र प्रदेशचा असून, त्याच्या वसतिगृहाच्या खोलीत त्याच्या रुममेट्सना लटकलेल्या अवस्थेत आढळला.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणार्‍या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की विद्यार्थ्याने (Student) आत्महत्या केली कारण त्याला "अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात आणि त्याचे शैक्षणिक कार्य पूर्ण करण्यात" समस्या येत होत्या. तपास पूर्ण झाल्यानंतर आणि पोस्टमॉर्टमनंतरच आणखी काही सांगता येईल, असे पोलिसांनी सांगितले.

विशेष म्हणजे, ही घटना 14 फेब्रुवारी रोजी IIT मद्रासमधील अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या एक महिन्यानंतर घडली. गेल्या महिन्यातही वसतिगृहात एक विद्यार्थी मृतावस्थेत आढळला होता.

तसेच, या घटनेची चौकशी नुकतीच निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींचा समावेश असलेली कायमस्वरुपी अंतर्गत चौकशी समिती करेल, असे महाविद्यालयाच्या (College) वतीने सांगण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, विद्यार्थ्याच्या पालकांना माहिती देण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT