Sonia Gandhi Dainik Gomantak
देश

सोनिया गांधींना ED ने उद्या पुन्हा बोलावले, 6 तास झाली चौकशी

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची सहा तास चौकशी केली.

दैनिक गोमन्तक

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची सहा तास चौकशी केली. ईडी अधिकाऱ्यांनी सोनिया गांधींना उद्या पुन्हा एकदा बोलावले आहे. आज त्यांची दोन फेऱ्यांमध्ये 6 तास चौकशी करण्यात आली. दुसरीकडे, सोनिया गांधींच्या चौकशीदरम्यान काँग्रेस नेत्यांनी रस्त्यावर निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी राहुल गांधींसह अनेक काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले.

तत्पूर्वी, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह सकाळी 11 वाजता अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात पोहोचल्या. काही वेळातच, ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोनिया गांधींची चौकशी सुरु केली, तर राहुल गांधी यांनी सरकारला लक्ष्य करत पक्षाच्या नेत्यांसह संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला.

दोन फेऱ्यांमध्ये 6 तास चौकशी

ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी सोनिया गांधी यांची दोन फेऱ्यांमध्ये सुमारे 6 तास चौकशी केली. ईडीने सोनिया गांधी यांना उद्या म्हणजेच बुधवारी पुन्हा समन्स बजावले आहे. नॅशनल हेराल्ड मनी लाँडरिंग प्रकरणात ईडी सोनिया गांधी यांची चौकशी करत आहे. यापूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांचीही चौकशी केली आहे.

पुन्हा एकदा प्रश्नांची सरबत्ती

ईडी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सोनिया गांधींकडून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे बाकी आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांनाही उद्या हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक राहिल्यास चौकशी लांबण्याची शक्यता आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rule Change: LPG सिलेंडर, FD, ATMपासून वाहनांच्या किमतीपर्यंत; 1 ऑक्टोबरपासून बदलले 6 मोठे नियम! तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Goa Tourism: दाबोळीवर उतरले 162 रशियन 'पाहुणे'; 2026-27 पर्यटन हंगामातील पहिले चार्टर दाखल, गोव्यात जंगी स्वागत

Gujarat ATS Drug Seizure: अरबी समुद्रात 3 हजार कोटींचे ड्रग्स जप्त! इराणच्या जहाजातून 526 किलो अमलीपदार्थ, पाकिस्तानचे 5 तस्कर ताब्यात

Rohit Sharma Celebration: 35वं वनडे शतक अन् रोहित शर्माचा हटके अंदाज! खास सेलिब्रेशनचा अर्थ विचारताच हिटमॅन म्हणाला, 'हे माझ्यासाठी...' VIDEO

Birch By Romeo Lane Fire: 25 मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 15 लाख! ‘बर्च’ अग्निकांडात लुथरा बंधूंचा उच्च न्यायालयात भरपाईचा मोठा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT