Smriti Mandhana Dainik Gomantak
देश

Smriti Mandhana: 'किंग' कोहलीला मागे टाकणारी 'क्वीन'! स्मृती मानधनाचा ऐतिहासिक विक्रम; 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच क्रिकेटपटू

Smriti Mandhana Break Virat Kohli Record: भारतीय सलामीवीर स्मृती मानधनाने एक तुफानी खेळी केली आणि या दरम्यान तिने विराट कोहलीचा एक मोठा विक्रम मोडला.

Sameer Amunekar

२०२५ च्या आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय फलंदाज स्मृती मानधना हिने इतिहास रचला आहे. विशाखापट्टणम येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तिने आपल्या बॅटने धडाकेबाज प्रदर्शन करत अनेक विक्रम मोडले आणि नवीन कीर्तिमान प्रस्थापित केले. विशेष म्हणजे, या सामन्यात तिने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडत स्वतःचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे.

स्मृती मानधनाने या सामन्यात फक्त ६६ चेंडूत ८० धावांची झंझावाती खेळी केली. तिच्या या खेळीत चौकार-षटकारांचा पाऊस पडला. जरी ती शतकापासून थोडीशी दूर राहिली, तरी तिने तिच्या या डावात अनेक मोठे टप्पे पार केले.

या सामन्यात स्मृती मानधनाने एकदिवसीय क्रिकेटमधील ५,००० धावा पूर्ण केल्या. ती हे पराक्रम करणारी सर्वात जलद भारतीय क्रिकेटपटू ठरली. मानधनाने हा टप्पा केवळ ११२ डावांमध्ये गाठला, तर विराट कोहलीने याच टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी ११४ डाव घेतले होते.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५००० धावा करणारे भारतीय खेळाडू (डावांवर आधारित):

  • ११२ डाव – स्मृती मानधना

  • ११४ डाव – विराट कोहली

  • ११८ डाव – शिखर धवन

  • १२६ डाव – सौरव गांगुली

  • १३५ डाव – एमएस धोनी

  • १३५ डाव – गौतम गंभीर

इतकेच नव्हे, तर मानधनाने या सामन्यात आणखी एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला. तिने २०२५ मध्येच एकदिवसीय स्वरूपात १,००० धावा पूर्ण केल्या, आणि ती असं करणारी जगातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरली.

भारतीय संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता, आणि स्मृती मानधनाच्या दमदार फलंदाजीमुळे भारताने मजबूत धावसंख्या उभारली मात्र भारताला या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narkasur in Goa: संपूर्ण भारतापेक्षा गोव्याची दिवाळी असते खास! राक्षस वधाने होते पहाट, कुठे पाहाल 'नरकासुर दहनाचा' थरार?

Taj Mahal Fire Video: प्रसिध्द ताजमहालच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वाराजवळ लागली आग, शॉर्ट सर्किटमुळं घडली घटना; व्हिडिओ आला समोर

NH 66 Closure: 'ट्रायल रन' फेल! सर्व्हिस रोडवरील गर्दीने पर्वरी हँग; चालकांनी व्यक्त केला तीव्र संताप

World Cup 2025: भारतीय महिला संघासमोर 'करो या मरो'ची स्थिती! सेमीफायनलचे दार उघडणार की बंद होणार? 2 पराभवांनंतरही संधी? वाचा संपूर्ण गणित

Horoscope: 'महादेवाचा दिव्य आशीर्वाद 'या' 3 राशींच्या डोक्यावर: सोमवारी दूर होतील जीवनातील सर्व समस्या; वाचा दैनिक राशिभविष्य

SCROLL FOR NEXT