Smriti Irani Dainik Gomantak
देश

Smriti Irani वादात; गोव्यातील बेकायदेशीर बारप्रकरणी काँग्रेसकडून राजीनाम्याची मागणी

स्मृती इराणी यांच्या मुलीवर गोव्यात सुरू असलेल्या बारचा परवाना बनावट असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर काँग्रेसकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. काँग्रेसकडून पंतप्रधानांना स्मृती इराणी यांचा तातडीने राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली आहे. स्मृती इराणी यांच्या मुलीवर गोव्यात सुरू असलेल्या बारचा परवाना बनावट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा परवाना बनावट पद्धतीने देण्यात आल्याचा काँग्रेस नेत्यांचा दावा आहे. त्यामुळे या बार परवान्याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. (Smriti Irani Row)

काँग्रेस नेते आणि खासदार जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'पंतप्रधानांनी स्मृती इराणी यांचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे. गोव्यातील त्यांच्या मुलीचा हा बार हा बेकायदेशीर आहे. त्या बारचा परवाना एका मृत व्यक्तीच्या नावाने घेण्यात आला आहे, असा आरोप खासदार रमेश यांनी केला आहे.

सत्तेचा वापर करून घोटाळा - काँग्रेस

स्मृती इराणी यांनी या प्रकरणी उत्तर देण्याची काँग्रेसकडून मागणी करण्यात आली आहे. शिवाय ज्या उत्पादन शुल्क आयुक्तांनी रेस्टॉरंटला नोटीस दिली, त्यांच्या बदलीची तयारी सुरू आहे, असाही आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच इराणीजी तुमच्या परवानगीशिवाय हे होत आहे का? ही हेराफेरी कशी सुरू झाली... फसवणूक लपवण्यासाठी सत्तेचा प्रभाव सुरू आहे का? असे प्रश्न उपस्थित करत, हा मुद्दा आम्ही संसदेत मांडणार असल्याचे जयराम रमेश यांनी सांगितले. त्याचबरोबर महिला आरटीआय कार्यकर्त्यांना संरक्षण मिळावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

स्मृती इराणी यांच्यावर हल्लाबोल करताना काँग्रेस नेता जयराम रमेश म्हणाले की, हा तू तू- मी मी चा प्रश्न नाही. स्मृती इराणी नेहमी सोनिया जी राहुल जी यांच्याबद्दल बोलतात, पण त्यांचं बोलणं निराधार असते. आम्ही पुराव्याच्या आधारे बोलत आहोत. काँग्रेसने आरटीआय कार्यकर्ते रॉड्रिग्ज यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. या आरोपांवर भाजपकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT