Mamata Banerjee Dainik Gomantak
देश

भाजपच्या 'गुन्ह्या'ची शिक्षा सर्वसामान्यांना का? ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

नुपूर शर्मांनी पैगंबर मुहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर निर्माण झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये.

दैनिक गोमन्तक

नुपूर शर्मांनी पैगंबर मुहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर निर्माण झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही हिंसाचार सुरुच होता. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यासाठी काही राजकीय पक्षांना जबाबदार धरले आहे. थेट नाव घेत ममता यांनी भाजपच्या 'गुन्ह्याची' शिक्षा सर्वसामान्यांना का द्यावी, असा सवाल केला आहे. दुसरीकडे, दुसऱ्या दिवशीही हिंसाचार सुरु राहिल्यानंतर हावडा जिल्ह्यातील काही भागात कर्फ्यू 15 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे.(Situation After Comment On Prophet Mohammad Mamata Banerjee Says Sins Of Bjp)

ट्विटमध्ये लिहिले

ममता बॅनर्जींनी (Mamata Banerjee) आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'हावडा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी हिंसाचार होत आहे. यामागे काही राजकीय पक्ष आहेत, ज्यांना दंगल घडवायची आहे.'

ममतांनी पुढे लिहिले की, 'परंतु हे सहन केले जाणार नाही. असे करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.' दुसरीकडे, ममतांनी प्रश्न विचारला की, 'भाजपचे पाप आणि जनतेचे हाल? पैगंबर यांच्यावरील वक्तव्यावरुन शुक्रवारी संपूर्ण देशात गदारोळ झाल्यानंतर शनिवारीही हे प्रकरण थंडावताना दिसत नाही, हे विशेष.'

15 जूनपर्यंत संचारबंदी

दरम्यान, पश्चिम बंगालमधील हावडा येथील पंचला बाजारमध्ये पोलिस (Police) आणि बदमाशांमध्ये चकमक झाली. यावेळी पोलिसांना जाळपोळ आटोक्यात आणण्यात मोठी अडचण आली. बिकट परिस्थिती पाहता विविध भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. ज्या भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे, ते उलुबेरिया उपविभाग अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग आणि सर्व रेल्वे स्थानके आहेत. इथे 15 जूनपर्यंत कर्फ्यू (Curfew) सुरु राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT