Jammu And Kashmir Dainik Gomantak
देश

Shopian Encounter: जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, 3 दहशतवादी ठार

Shopian Encounter: जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये मंगळवारी सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले.

दैनिक गोमन्तक

Shopian Encounter: जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये मंगळवारी सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले. या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेले दहशतवादी लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba) चे सदस्य होते, ज्यांना खोऱ्यात मोठी कारवाई करायची होती.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शोपियानच्या (Shopian) नागबल भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरु केली. ऑपरेशन दरम्यान चकमक झाली, ज्यामध्ये सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना (Terrorists) ठार केले.

काश्मीरचे एडीजीपी विजय कुमार (ADGP Kashmir Vijay Kumar) यांनी सांगितले की, ठार झालेले तीन दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचे स्थानिक दहशतवादी आहेत. दानिश खुर्शीद भट, तन्वीर वानी आणि तौसीफ भट अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. या दहशतवाद्यांचा यापूर्वी काश्मीरमधील अनेक दहशतवादी घटनांमध्ये सहभाग होता. एडीजीपी विजय कुमार यांनी पुढे सांगितले की, यापैकी दानिश नावाचा दहशतवादी शोपियानमध्ये तरुणांना फसवून दहशतवादी बनवण्याचे काम करायचा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा अन् सत्तरी-साखळीत वादळी पाऊस; पुढील 4-5 दिवस उष्मा कायम राहणार

Tourist Safety: दलालांवर 'ड्रोन'ची नजर, एआयने आवळणार फास; 'बीच व्हिजिल ॲप'ही होणार अपग्रेडच, पर्यटनमंत्र्यांची माहिती

VIDEO: कदंब कर्मचाऱ्यांवर कोयता घेऊन धावला; हल्ल्याच्या प्रयत्नानंतर रिवे मार्गावरील बससेवा दोन दिवसांपासून बंद

Goa Electricity: गोव्यात 80 मेगावॅट वीजटंचाई; उद्योगांना भारनियमनाचा धोका, बैठकीतही तोडगा नाही

SCROLL FOR NEXT