Work From Home Dainik Gomantak
देश

Work From Home बद्दल केलेल्या सर्वेक्षणातून समोर आल्या धक्कादायक गोष्टी

सर्वेक्षण (Survey) केलेल्यांपैकी 59 टक्के पुरुष कामगारांचे असे मत आहे की, Work From Home दबावामुळे त्यांच्या वैयक्तिक जीवनावर परिणाम होतोय.

Sudhir Kakde

कोवीड-19 मुळे (Covid -19) जगभरात लॉकडाऊन (Lockdown) लागला आणि अनेकांना वर्क फ्रॉंम होम करावे लागले. मात्र आता घरुन काम करणे ही एक नवीन सामान्य बनली आहे. वर्क फ्रॉंम होम बद्दल झालेल्या एका सर्वेमधुन (survey) असे समोर आले आहे की, 59 टक्के पुरुष कर्मचाऱ्यांनी कामाच्या तणावाचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक जीवनावर होत असल्याचे सांगितले आहे. स्किकी मार्केट नेटवर्कच्या सर्वेक्षणानुसार (Scikey market network) काही महत्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. (Shocking findings from the Work From Home survey by scikey Market Network)

सर्वेक्षण केलेल्यांपैकी 59 टक्के पुरुष कामगारांचे असे मत आहे की, कामाच्या दबावामुळे त्यांच्या वैयक्तिक जीवनावर परिणाम होतोय. तर हेच मत असणाऱ्या महिलांची संख्या 56 टक्के होती. सर्वेक्षणानुसार वर्क फ्रॉंम होम दरम्यान कर्मचार्‍यांवर कामाचा ताण वाढत असून त्यांना नोकरीतील आव्हानां देखील सामोरे जावे लागते आहे. त्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि वैयक्तिक जीवनावर मोठा परिणाम होतो आहे.

देशातील महानगरांमध्ये 20 ते 26 जून दरम्यान स्केकी मार्केट नेटवर्कने हे सर्वेक्षण केले. सर्वेक्षण केलेल्यांपैकी केवळ 23 टक्के लोकांनी जास्त अडचण नसल्याचे सांगितले. सर्वेक्षण केलेल्या 20 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, त्यांना कामाच्या वेळी कुटूंबीयांचा आधार मिळाला नाही. अशा विचार करणार्‍या महिलांची संख्या 16 टक्के होती. सर्वेक्षणात 68 टक्के पुरुष असे म्हणाले की, कामकाजाच्या वेळी कधीकधी मन विचलित होते. त्याच वेळी, 77 टक्के स्त्रिया देखील असेच म्हणाल्या. यादरम्यान रोजगार गमावण्याची भीतीही वाढली आहे.

सर्वेक्षणानुसार 22 टक्के पुरुषांनी नोकरी गमावली असुन, 60 टक्के लोकांना त्यांच्या भविष्याबद्दल असुरक्षितता वाटते आहे. दुसरीकडे, नोकरी गमावल्यामुळे 17 टक्के महिलांवर परिणाम झाला आहे आणि आणि 27 टक्के महिलांना भविष्याबद्दलची चिंचा सतावते आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: गोव्यात भाजपाला पर्याय उभा राहणार का ?

पंचायतींच्या कारभारात पारदर्शकता येणार; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल! बैठकीचा अजेंडा आणि फाईल्स पाहण्याचा सदस्यांना अधिकार

Goa Assembly Protest: विधानसभेत फलक झळकावणे माजी मंत्री पाऊसकरांना भोवले, पाच जणांच्या अडचणीत वाढ; 300 पानी आरोपपत्र दाखल

Goa Crime: लुटमार, मारहाण अन् दहशत! वृद्धांना कोंडून सोनं लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पाच बांगलादेशी जेरबंद; गोवा पोलिसांना मोठं यश

Goa Cooperative Bank NPA Recovery: 'एनपीए'चे ओझे कमी करण्यासाठी सहकार खाते ॲक्शन मोडमध्ये! 65 लाखांची ‘एनपीए’ कर्जे वसूल; मंत्री शिरोडकरांची माहिती

SCROLL FOR NEXT