ShivSena Leader Shot Dead Dainik Gomantak
देश

ShivSena Leader Shot Dead: शिवसेना नेत्याची पोलिसांसमोरच गोळी घालून हत्या

हल्लेखोरास अटक; हल्लेखोर पळून जात असताना कारवर जमावाची दगडफेक

गोमन्तक डिजिटल टीम

ShivSena Leader Shot Dead: पंजाबच्या अमृतसर येथील शिवसेना नेते सुधीर सुरी यांची शुक्रवारी गोळी मारून हत्या करण्यात आली. शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेनंतर खळबळ माजली आहे. घटनास्थळ परिसरातही तणावाचे वातावरण आहे.

गोपाळ मंदिराबाहेरील कचऱ्यात देवतांच्या मुर्ती आढळल्या होत्या. त्या विरोधात सुरी हे मंदिराबाहेर धरणे आंदोलनाला बसले होते. यावेळी गर्दीतील एकाने त्यांच्यावर गोळी झाडली. त्यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. पण खूप रक्तस्त्राव झाल्याने उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी परिसराची नाकाबंदी करत हल्लेखोर संदीप सिंह याला अटक केली आहे. त्याच्याकडून हल्ल्यात वापरलेली बंदुकही जप्त करण्यात आली आहे. तो अमृतसर येथीलच रहिवाशी आहे. तो व्यवसायाने दुकानदार आहे. सुधीर हे शिवसेना हिंदुस्थानचे प्रमुखही होते.

गेल्या काही काळापासून सुरी यांच्यावर हल्ल्याचा कट आखला जात होता. पोलिसांनी गेल्या महिन्यात काही गँगस्टर्सना अटक केली होती. त्यावेळी चौकशीत त्यांनी हा खुलासा केला होता. जीवाचा धोका असतानाही सुरी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत चुक राहिली.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सुधीर सुरी जेव्हा पोलिस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत होते, तेव्हा एका व्यक्तीने त्यांच्यावर दोन ते तीन गोळ्या झाडल्या. हल्लेखोर स्विफ्ट कारमधून आला होता. गोळ्या झाडून तो त्याच कारमधून पळून जात असताना लोकांनी कारवर दगडफेक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT