Shashi Tharoor gets clear of charges in Sunanda Pushkar case Dainik Gomantak
देश

Sunanda Pushkar Case: काँग्रेस नेते Shashi Tharoor यांची निर्दोष मुक्तता

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी (Sunanda Pushkar Case) दिल्ली न्यायालयाने काँग्रेस नेते शशी थरूर यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

दैनिक गोमन्तक

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी (Sunanda Pushkar Case) दिल्ली न्यायालयाने काँग्रेस नेते शशी थरूर यांची (Shashi Tharoor) निर्दोष मुक्तता केली आहे.

पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी काँग्रेस (Congress) खासदार (Member Of Parliament) शशी थरूर यांना दिल्ली न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने सुनंदा पुष्कर हत्येच्या आरोपातून शशी थरूर यांची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर थरूर यांनी न्यायालयाचे आभार मानले आणि सांगितले की, ते 7.5 वर्षांपासून या यातना आणि वेदना सहन करत आहेत.(Shashi Tharoor gets clear of charges in Sunanda Pushkar case)

विषामुळे झाला होता सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचे प्रकरण तेव्हा अत्यंत हायप्रोफाईल प्रकरण मानले जात होते. 29 सप्टेंबर 2014 रोजी एम्सच्या वैद्यकीय मंडळाने सुनंदाच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल दिल्ली पोलिसांना सुपूर्द केला. सुनंदाचा मृत्यू विषाने झाल्याचे या अहवालात म्हटले होते. बोर्डाने म्हटले होते की अशी अनेक रसायने आहेत जी पोटात गेल्यानंतर किंवा रक्तात गेल्यानंतर विष बनतात.

शशी थरूर यांना आरोपी का करण्यात आले?

शशी थरूर आणि सुनंदा पुष्कर यांचे 2010 मध्ये मल्याळी रितीरिवाजानुसार लग्न झाले. 2007 मध्ये एका कार्यक्रमादरम्यान दोघांची भेट झाली. थरूर यांचे हे तिसरे लग्न होते. लग्नाच्या चार वर्षानंतर दोघांमध्ये दुरावाच्या बातम्या येऊ लागल्या. सुनंदाचा मृतदेह जानेवारी 2014 मध्ये दिल्लीतील एका हॉटेलमध्ये सापडला होता.

नंतर, जेव्हा तपास सुरू झाला तेव्हा शशी थरूर यांचे नाव त्यात दिसू लागले. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात सुनंदा पुष्करच्या भावाचेही निवेदन होते. सुनंदाच्या भावाने सांगितले होते की, ती तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे, पण तिच्या मृत्यूच्या काही दिवस आधी वैवाहिक जीवनाबद्दल तणावात होती. नोकराने पोलिसांना दिलेल्या निवेदनात असेही म्हटले होते की, सुनंदा पुष्कर आणि शशी थरूर यांच्यात पूर्वी भांडण होत असे.

या प्रकरणी शशी थरूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फॉरेन्सिक सायन्स ऑटोप्सी अॅनालिसिसच्या अहवालात असे स्पष्ट झाले की सुनंदा पुष्कर मानसिक तणावात होती आणि तिने अनेक दिवसांपासून अन्न सोडले होते. ती सतत धूम्रपान करत होती. नैसर्गिक मृत्यू न होण्याची शक्यताही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT