Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

Rahul Gandhi: 'आम्ही घाबरत नाही,' फोन टॅपिंगच्या प्रकरणावर राहुल गांधींचा एल्गार

Rahul Gandhi: तुम्हाला माझा फोन घ्यायचा असेल तर मी द्यायला तयार आहे.

दैनिक गोमन्तक

Rahul Gandhi: विरोधीपक्ष नेत्यांनी त्यांचे अॅपल फोन हॅक केल्याचा गंभीर प्रकरणानंतर आता यावर कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भाष्य केले आहे. ते म्हणतात- खूप कमी लोक या विरोधात लढा देत आहेत परंतु आम्ही घाबरत नाही. तुम्ही तुम्हाला पाहिजे तितके फोन टॅपिंग करू शकता, मला पर्वा नाही. तुम्हाला माझा फोन घ्यायचा असेल तर मी द्यायला तयार आहे.

पुढे त्यांनी असेही म्हटले आहे, की सुरुवातीला मी असा विचार करत होतो की एक नंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे, दुसऱ्या नंबरला अदानी आहेत आणि तिसऱ्या नंबरला अमित शहा आहेत.

पण अदानी एक नंबरला आहेत, दुसऱ्या नंबरला मोदी( modi ) आहेत आणि तिसऱ्या नंबरला अमित शहा आहेत. हे राजकारण आहे. मूळ मुद्यापासून बाजूला सारण्यासाठी, लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हे सगळे केले जात आहेत.

मात्र अदानी यामध्ये फसलेले आहेत, त्यांची यातून सुटका होऊ शकत नाही असेही राहुल गांधींनी पत्रकार परिषदेदरम्यान म्हणत त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे.

दरम्यान, अदानी यांनी सामान्य जनतेला फसवल्याचा आरोप यापूर्वीदेखील राहुल गांधीं( Rahul Gandhi )नी केली होती. आता भाजप यावर काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. नेत्यांचे आय़फोन हॅक करुन त्यावर धमकीचे मेसेज आल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT