SC On Live-in Relationships Dainik Gomantak
देश

SC On Live-in Relationships: लिव्ह-इन रिलेशनशिपवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वाचा एका क्लिकवर

सुप्रीम कोर्टाने लिव्ह-इन रिलेशनशिपच्या नोंदणीच्या मागणीवर सुनावणी देण्यास नकार दिला आहे.

दैनिक गोमन्तक

Supreme Court On Live-in Relationships: लिव्ह-इन रिलेशनशिपच्या (Live-in Relationships) नोंदणीच्या मागणीवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

याचिकाकर्त्याने अशा संबंधांच्या नोंदणीसाठी यंत्रणा निर्माण करण्याची मागणी केली होती, जी सर्वोच्च न्यायालयाने अव्यवहार्य ठरवली असुन फेटाळली आहे.

याचिकेत श्रद्धा वालकर आणि निक्की यादव हत्या प्रकरणाचा हवाला देण्यात आला होता. गोपनीय पद्धतीने सुरू असलेले असे संबंध सतत अघोरी गुन्ह्यांना कारणीभूत ठरत असल्याचे सांगण्यात आले. लिव्ह-इन पार्टनरच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडे त्यांच्या नातेसंबंधाची माहिती असणे आवश्यक आहे.

हे प्रकरण मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा आणि जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर आले तेव्हा त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. 

सरन्यायाधीश म्हणाले, "ही कोणत्या प्रकारची मागणी आहे? लोकांना असे नाते कसे नोंदवायचे आहे, असे तुम्हाला वाटते? अशा प्रकारची याचिका नुकसान भरपाई देऊन फेटाळली पाहिजे."

सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याची बाजू मांडणाऱ्या वकिलांना विचारले की तुम्हाला काय हवे आहे. लिव्ह इन रिलेशनशिपची नोंदणी कुठे होईल? केंद्र सरकारने त्यासाठी व्यवस्था करावी, असे वकील म्हणाले. यानंतर न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली.

नोंदणी अनिवार्य केल्यावर...

सुप्रीम कोर्टातील वकील ममता राणी यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते की, लिव्ह-इन पार्टनरच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडे त्यांच्या नातेसंबंधाची माहिती असणे आवश्यक आहे.

लिव्ह-इनमध्ये किती लोक राहतात याची माहिती गोळा करावी. जेव्हा लिव्ह इन रिलेशनची नोंदणी अनिवार्य केली जाईल तेव्हाच ही माहिती उपलब्ध होईल.

याचिकेत असेही म्हटले होते की, सर्वोच्च न्यायालयाने अनेक आदेशात लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या लोकांना संरक्षण दिले आहे. अशा संबंधांचा विचार मूलभूत अधिकारांच्या कक्षेत केला जातो. पण सध्या अशा संबंधांची नोंदणी करण्याची कोणतीही व्यवस्था नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT