SBI Recruitment 2021

 

Dainik Gomantak

देश

SBI Recruitment 2021: SBI मध्ये 1200 पेक्षा जास्त पदांसाठी होणार भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सर्कल बेस्ड ऑफिसर या पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत

दैनिक गोमन्तक

SBI Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सर्कल बेस्ड ऑफिसर या पदांच्या भरतीसाठी (Recruitment) इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर आहे.

याशिवाय उमेदवार थेट या लिंकवर जावून देखील माहिती मिळवू शकतात. https://ibpsonline.ibps.in/sbircbonov21/त्यावर क्लिक करून तुम्ही या पदांसाठी अर्ज देखील करू शकता. तसेच अधिकृत अधिसूचनेसाठी तुम्ही ही लिंकhttps://sbi.co.in/documents/77530/11154687/081221-CBO-21+Final+Detaile पाहू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 1226 पदे भरली जाणार आहेत.

महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात तारीख - 9 डिसेंबर 2021

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 डिसेंबर 2021

रिक्त जागा तपशील

एकूण पदांची संख्या- 1226

शैक्षणीक पात्रता

उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.

वयोमर्यादा

उमेदवारांची वयोमर्यादा 21 वर्षांपेक्षा जास्त आणि 30 वर्षांपेक्षा कमी असावी.

अर्ज शुल्क

सामान्य श्रेणी / इतर श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क 750 रुपये भरावे लागतील, तर SC/ST/PWBD अंतर्गत अर्ज करणाऱ्यांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

निवड प्रक्रिया

ऑनलाइन लेखी परीक्षा, स्क्रीनिंग आणि मुलाखत या 3 टप्प्यांतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

वेतनश्रेणी

उमेदवारांचे मूळ वेतन अंदाजे 36,000 रूपये असण्याची शक्यता आहे आणि अधिकार्‍यांना DA, HRA/लीज भाडे, CCA, वैद्यकीय आणि नियमानुसार इतर भत्ते देखील दिले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT