Sadhana Gupta Dainik Gomanatk
देश

मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांनी घेतला अखेरचा श्वास

साधना गुप्ता काही दिवसांपासून आजारी होत्या.

दैनिक गोमन्तक

Sadhana Gupta: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचे शनिवारी निधन झाले. साधना गुप्ता काही दिवसांपासून आजारी होत्या. नुकतेच त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. साधना यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते, शनिवारी सकाळपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती, अखेर तिथे त्यांनी दुपारी अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, मेदांता हॉस्पिटलकडून त्यांच्या मृत्यूला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. काही वेळापूर्वी मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) पत्नीला भेटण्यासाठी रुग्णालयातून गेले होते.

दुसरीकडे, गेल्या आठवड्यापासून त्या शुगरसह इतर विविध आजारांनी त्रस्त होत्या. मुलायम सिंह यांच्या पत्नी साधना गुप्ता (Sadhana Gupta) यांचे पार्थिव प्रथम दिल्ली आणि नंतर सैफई येथे नेण्यात येणार आहे. मुलायमसिंह यादव सध्या दिल्लीत असून, अखिलेशही लखनौहून निघाले आहेत.

तसेच, साधना गुप्ता या सपा नेते मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी असून सपा प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या सावत्र आई आहेत. साधना यांच्या मुलाचे नाव प्रतीक यादव आणि सुनेचे नाव अपर्णा यादव आहे. आपल्या स्पष्टवक्त्या वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अपर्णा यादव या भाजपच्या नेत्या आहेत. 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच अपर्णा यादव यांनी सपा सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT