Sam Pitroda Dainik Gomantak
देश

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Sam Pitroda Controversial Statement: इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी वादग्रस्त वक्तव्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Manish Jadhav

Sam Pitroda Controversial Statement: इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी वादग्रस्त वक्तव्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. वर्णद्वेषी वक्तव्य केल्यानंतर ते विरोधकांच्या निशाण्यावर होते. काँग्रेस पक्षानेही त्यांच्या या वक्तव्यापासून फारकत घेतली. पित्रोदा यांच्या वक्तव्यावरुन राजकीय वादाला तोंड फुटले होते. दरम्यान, पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, पक्ष नेतृत्वाने पित्रोदा यांचा राजीनामा स्वीकारला आहे. रमेश यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, "सॅम पित्रोदा यांनी स्वेच्छेने इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे."

दरम्यान, सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर एकच हल्लकल्लोळ उडाला. पित्रोदा यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर यूजर्संनी मीम्सचा धडाकाच लावला. सोशल मीडिया यूजर्स पित्रोदा यांचा चांगलाच समाचार घेऊ लागले आहेत. यूजर्संनी मीम्सच्या रुपात आपल्या प्रतिक्रीया दिल्या. वरुण कुमार राणा नावाच्या एका यूजर्सने आपल्या पोस्टमध्ये सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचा फोटो दाखवला. *As per Sam Pitroda* असे लिहिले. तर मिक्की नावाच्या यूजर्सने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, Indians according to Sam Pitroda... तर पोर्णिमा (मोदी का परिवार) नावाच्या महिला यूजर्सने आपल्या पोस्टमध्ये माकडाचा आणि सॅम पित्रोदा यांचा फोटो दाखवला... तर राजू बाबू नावाच्या यूजर्सने पंतप्रधान मोदींच्या मांडीवर सॅम पित्रोदा बसलेले दाखवत पोस्टमध्ये लिहिले की, ‘Daily daily ek bayaan diya kar’

'द स्टेट्समन' या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पित्रोदा यांनी हे वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, ‘’आम्ही भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाला एकत्र ठेवू शकतो, जिथे पूर्वेकडील लोक चिनी लोकांसारखे दिसतात, पश्चिमेकडील लोक अरबांसारखे दिसतात, उत्तरेकडील लोक गोरे आणि दक्षिण भारतीय आफ्रिकनसारखे दिसतात. परंतु याने काही फरक पडत नाही, आम्ही सर्व बंधू-भगिणी आहोत.’’

पित्रोदा यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक विरोधी पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. यानंतर पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी त्यांच्या विधानापासून पक्षाला दूर केले आणि सोशल मीडिया 'X' वर लिहिले की, “सॅम पित्रोदा यांनी पॉडकास्टमध्ये भारतातील विविधता दर्शवण्यासाठी दिलेली उदाहरणे अत्यंत दुर्दैवी आणि अस्वीकार्य आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या उदाहरणांपासून पूर्णपणे अलिप्त आहे.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT