Navjyot Singh Sidhu Road Rage Case Dainik Gomantak
देश

Road Rage Case: नवज्योतसिंग सिद्धू यांना सुप्रीम कोर्टाकडून 1 वर्षाचा कारावास

या मारहाणीत एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. यापूर्वी सिद्धूला 1000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

दैनिक गोमन्तक

रोड रेज प्रकरणी नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांना सुप्रीम कोर्टाकडून झटका मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने जुना आदेश बदलून 1 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. हे प्रकरण 1988 सालचे आहे. या मारहाणीत एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. यापूर्वी सिद्धू यांना 1000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. (Road Rage Case)

याआधी काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती की, हे प्रकरण 33 वर्षे जुने आहे. सुप्रीम कोर्टाने या खटल्यातील शिक्षेला स्थगिती दिल्याचे त्यांनी सांगितले होते.

विशेष म्हणजे पीडितेच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या या याचिकेत नोटीसची व्याप्ती वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. पटियाला येथे 1988 मध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात पार्किंगवरून वाद झाला होता, त्यात गुरनाम सिंग या वृद्धाचा मृत्यू झाला होता.

नवज्योत सिद्धू आणि गुरनाम सिंग यांच्यात बाचाबाची झाल्याचा आरोप आहे. या संपूर्ण घटनेत पोलिसांनी नवज्योतसिंग सिद्धू आणि त्याचा मित्र रुपिंदरसिंग सिद्धू यांच्याविरुद्ध निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या वर्षी मार्च महिन्यात, 33 वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणात सिद्धूच्या शिक्षेत वाढ करण्याची मागणी करणाऱ्या पीडित कुटुंबाच्या पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल राखून ठेवला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: गोव्याच्या 'निधी'चा 'यूपी'त वापर; खासदार सदानंद शेट तानावडेंवर काँग्रेसकडून टीका

FIFA World Cup 2026: स्वित्झर्लंड चितपट! 3-1 ने विजय मिळवत अर्जेंटिनाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, इंग्लंडविरुद्ध होणार हाय-व्होल्टेज सामना

Goa Drug Case: पणजीत 'अंमली पदार्थ तस्करी'चा पर्दाफाश! 15 लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू

मंत्री माविन, बाबूश यांना दिलासा, 'त्‍या' बहुचर्चित प्रकरणांना आव्‍हान न देण्‍याचा पोलिसांचा निर्णय

Goa Cyber Crime: दररोज 15 गोमंतकीय सायबर जाळ्यात! गुन्हेगारीचा वाढतोय फास; राज्यात सहा महिन्यांत 2,637 जणांना गंडा

SCROLL FOR NEXT