PM Modi Dainik Gomantak
देश

Viral Video: PM मोदींबाबत आरजेडी नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य; भाजपने व्हिडिओ शेअर करत ECI कडे केली तक्रार

Lok Sabha Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे.

Manish Jadhav

Lok Sabha Elections 2024:

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यामुळे एकीकडे प्रचाराला वेग आला आहे तर दुसरीकडे नेत्यांनी बेताल वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका बैठकीतील आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये एका RJD नेत्यावर पंतप्रधान मोदींबाबत अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा दावा केला आहे. एवढ्यावरच न थांबता भाजपने झारखंडचे डीजीपी आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार करुन कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, झारखंडचे भाजपचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी अवघ्या 5 सेकंदांचा एक व्हिडिओ जारी केला आहे. व्हिडिओमध्ये काही लोक बसून बोलत आहेत आणि बॅनरच्या मागे 'इंडिया' असे लिहिलेले आहे. ही बैठक इंडिया आघाडीची असल्याचा भाजपचा दावा आहे. यामध्ये एक व्यक्ती 'मोदींच्या डोक्यात गोळी मारली तर त्याला चूक म्हणणार का?' असे म्हणताना स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, याच्या अगोदर किंवा नंतरचे काहीही फारच छोट्या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत नाहीये. मात्र, या व्हायरल व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही.

बाबूलाल मरांडी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, 'इंडिया आघाडीच्या बैठकीचा अजेंडा पाहा. चार दिवसांपूर्वी झारखंडमधील कोडरमा येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत आरजेडी नेते अवधेश सिंह यादव मोदींच्या डोक्यात गोळी मारण्याबाबत बोलत आहेत. आपला पराभव दिसत असल्याचे पाहून सर्वच विरोधी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. इंडिया आघाडीने कोणतेही षड्यंत्र रचू देत, मोदींचा 140 कोटी जनतेचा परिवार पंतप्रधानांच्या पाठीशी खंभीरपणे उभा आहे.'' दुसरीकडे, निवडणूक आयोग आणि डीजीपीला टॅग करत त्यांनी कारवाईची मागणी केली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'आदरणीय पंतप्रधानांना गोळ्या घालण्याबाबत बोलणाऱ्या या गुन्हेगाराला ताबडतोब अटक करा आणि तुरुंगात पाठवा.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT