National Consumer Day Dainik Gomantak
देश

National Consumer Day: राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जाणून घ्या ग्राहकांचे अधिकार

National Consumer Day : फसवणूक होऊ नये, ग्राहकांना त्यांचे अधिकार माहिती व्हावेत यासाठी २४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून साजरा करतात

दैनिक गोमन्तक

दैनंदिन जीवनात आपण अनेक गोष्टींची खरेदी करत असतो. परंतु आपल्याला ग्राहक म्हणून आपले अधिकार माहित असतात का? ग्राहकांना त्यांचे अधिकार माहित नसल्यामुळे त्यांची अनेकदा फसवणूक होताना दिसते. अशा प्रकारची फसवणूक होऊ नये, ग्राहकांना त्यांचे अधिकार माहिती व्हावेत यासाठी २४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून साजरा करतात . आज राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांचे अधिकार काय आहेत जाणून घेऊयात.

1.सुरक्षेचा अधिकार

ग्राहकांना मिळत असलेल्या वस्तू उत्तम दर्जाच्या असायला हव्यात. त्याचबरोबर,ग्राहकांना त्या मिळतात तेव्हा त्या व्यवस्थित असणे गरजेचे असते. जर वस्तू खराब असेल तर ती बदलून घेण्याचा अधिकारही ग्राहकांना आहे.

2.माहितीचा अधिकार

ग्राहकांच्या माहितीच्या अधिकारांतर्गत ग्राहकाला वस्तूच्या दर्जाबद्दल जाणून घेण्याचा अधिकार आहे. ग्राहक सर्व्हीस, दर्जा आणि किंमतीबाबत कोणताही प्रश्न दुकानदाराला विचारु शकतो.

3.निवडीचा अधिकार

ग्राहक आपल्या आवडीनुसार कोणतीही वस्तू निवडू शकतो. कोणतीही वस्तू निवडण्यासाठी अथवा कोणतीही वस्तू विकत घेण्यासाठी ग्राहकावर दबाव टाकला जाऊ शकत नाही.

4.ऐकूण घेण्याचा अधिकार

जर ग्राहकांवर कोणता अन्याय झाला असेल तर ग्राहक त्याविषयीची तक्रार करु शकतो. ग्राहक कोर्टामध्ये जाऊन तो तक्रार करु शकतो.

5.वस्तू बदलण्याचा अधिकार

जर ग्राहकाला खराब वस्तू मिळली असेल तर त्याऐवजी दुसरी वस्तू घेण्याचा किंवा वस्तूचे पैसे परत घेण्याचा अधिकार ग्राहकाला मिळतो.

6.आपल्या अधिकाराची माहिती मिळण्याचा अधिकार

ग्राहकाला आपल्या अधिकारांची माहिती असण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याचबरोबर, आपल्याबरोबर होत असलेल्या अन्यायाविषयी माहिती असणे गरजेचे आहे.

ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी शासन ग्राहकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणत असते. त्याचबरोबर, ग्राहकांनीसुद्धा आपल्या हक्क जाणून घेणे,जागरुकता ठेवणे गरजेचे असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT