देश

महसूल अधिकारी मध्यरात्री घुसला महिला पीसीएस अधिकाऱ्याच्या घरात, कपडे फाडून बलात्काराचा प्रयत्न

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील बस्तीमधून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील बस्तीमधून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री महसूल अधिकाऱ्याने एका महिला अधिकाऱ्याच्या शासकीय निवासस्थानात घुसून मारहाण करण्याचा आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्याने महिला अधिकाऱ्याला जमिनीवर आपटले आणि मारहाण केली.

दरम्यान, तिने विरोध केला असता तिचे कपडे फाडण्यात आले. याप्रकरणी महिला अधिकाऱ्याने बस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या संबंधित आरोपी अधिकारी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोपीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला

दरम्यान, ही संपूर्ण घटना 12 नोव्हेंबरच्या रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे. महिला अधिकारी तिच्या घरी एकटी होती, याचच फायदा घेऊन मध्यरात्री 1 वाजता आरोपी अधिकारी तिच्या निवासस्थानी घुसला. याआगोदर त्याने घराचा दरवाजा ठोठावला, मात्र महिला अधिकाऱ्याने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर आरोपी (Accused) घराच्या मागे पोहोचला. त्याने लाथ मारुन घराच्या मागचा दरवाजा तोडला.

दरम्यान, जबरदस्तीने घरात घुसल्यानंतर त्याने आधी तिला थप्पड मारली आणि नंतर तिच्यासोबत बळजबरी सुरु केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. तिने विरोध केल्यावर त्याने तिच्या शरीराच्या अनेक भागांवर चावा घेतला, नंतर तिला जमिनीवर आपटले आणि तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, यादरम्यान तिने विरोध केला असता तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर अधिकारी बेशुद्धावस्थेत असल्याचे पाहून तो दुसऱ्या दारातून निघून गेला. त्यानंतर मग घाबरुन पीडिता पलंगाखाली लपली. ती मोठ्या मुश्किलीने दरवाजाकडे धावली आणि दरवाजा बंद केला.

संपूर्ण हकीकत कुटुंबीयांना सांगितली

पीडितेने तिच्या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, मी घराच्या मागील दरवाजाला कुलूप घातले. मी तीन दिवस घरीच घाबरुन बसले होते. यादरम्यान मी कोणालाही काहीही सांगितले नाही. त्यानंतर 15 नोव्हेंबरला मी तीन दिवसांची सुट्टी घेऊन माझ्या आई-वडिलांकडे गेली, त्यानंतर मी माझ्या घरच्यांना संपूर्ण हकीकत सांगितली.

त्यानंतर कुटुंबीय पुढे आले आणि त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. एएसपी दीपेंद्र चौधरी यांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित आरोपी अधिकाऱ्याविरोधात कलम 376,307,452,323,504,354,511 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस (Police) तपास करत आहेत. चौकशीच्या आधारे कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhaje Ghar Yojana: अमित शहा उघडणार 'माझे घर'चे द्वार, 50 टक्‍के गोमंतकीयांना मिळणार लाभ - मुख्‍यमंत्री

Mopa Airport: मोपा विमानतळाबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्याला गोवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या VIDEO

Smriti Mandhana Century: स्मृती मानधनाचं ऐतिहासिक 'शतक'! सलग दोन वर्षांत अशी कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला क्रिकेटपटू VIDEO

तोंडावर गोळी घातली नंतर वाहनाखाली चिरडले; गुरांच्या तस्करीला विरोध करणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या

SBI Bank Robbery: कर्नाटकातील एसबीआय बँकेवर मोठा दरोडा! तीन दरोडेखोरांनी लुटले 21 कोटींचे दागिने आणि रोकड, आरोपी पंढरपूरच्या दिशेने पसार

SCROLL FOR NEXT