Rafale 

 

Dainik Gomantak 

देश

भारतात 'या' महिन्यात उर्वरित राफेल दाखल होणार

भारतीय वायुसेनेचे (IAF) प्रमुख मार्शल विवेक राम चौधरी यांनी राफेल वेळेवर पोहोचवल्याबद्दल फ्रान्सचे आभार मानले.

दैनिक गोमन्तक

भारतीय वायुसेनेचे (IAF) प्रमुख मार्शल विवेक राम चौधरी (Vivek Ram Chaudhari) यांनी शनिवारी डसॉल्ट राफेल लढाऊ विमाने भारताला वेळेवर पोहोचवल्याबद्दल फ्रान्सचे आभार मानले व उर्वरित राफेल (Rafale) देशात कधी दाखल होतील याची माहिती दिली. मागवलेल्या 36 पैकी 32 राफेल देशात पोचले आहेत. उर्वरित 4 पैकी 3 लढाऊ विमाने पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत वितरित केले जातील तर उर्वरित एकाचे वितरण सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच होईल.

“करार 36 विमानांसाठी होता, त्यापैकी 32 आधीच वितरित केले गेले आहेत. उर्वरित चारपैकी तीन फेब्रुवारीमध्ये वेळेवर पोहोचतील. शेवटचे विमान, ज्यात विशिष्ट सुधारणा असतील, त्याच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच ते भारताला (India) मिळेल. आम्ही संरक्षणमंत्र्यांशी राफेलच्या भविष्यातील देखभालीच्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे," असे मार्शल विवेक राम चौधरी म्हणाले.

फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, फ्रान्स (France) भारताला अतिरिक्त राफेल लढाऊ विमाने देण्यास तयार आहे. पार्ली यांनी प्रादेशिक सुरक्षा आणि इंडो-पॅसिफिकमधील सहकार्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशीही चर्चा केली. या वेळेस सर्व क्षेत्रांमध्ये संरक्षण सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवरही चर्चा झाली.

चौधरी यांनी भारत-चीन (Indo-China) सीमेवरील परिस्थिती वर भाष्य केले. ते म्हणाले, "लडाखमधील काही भागातून सैन्याने माघार घेतली असली तरी, संपूर्ण सैन्य परतलेले नाही."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT