Parade Rehearsal in Delhi  Dainik Gomantak
देश

Republic Day Parade: प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत वाहतूक सूचना जारी

प्रजासताक दिनानिमित्त (Republic Day) दिल्लीत परेड रिहर्सलसाठी 17,18 20 आणि 21 जानेवारीला सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

देशात 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. प्रजासत्ताकदिना निमित्त (Republic Day) परेडच्या रिहर्सला सुरुवात झाली असून दिल्ली पोलिसांनी शनिवारी वाहतुकी संबंधित नियमावली जारी केली आहे. त्यानुसार 17 जानेवारी ते 21 जानेवारीपर्यंत सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत राजपथ-रफी मार्ग, राजपथ-जनपथ, राजपथ-मानसिंग रोड आणि राजपथ- सी-हेक्सागन या मार्गांवर वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. विजय चौक ते इंडिया गेट हा मार्गसुद्धा वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

प्रजासताक दिनानिमित्त दिल्लीत परेड रिहर्सलसाठी 17,18 20 आणि 21 जानेवारीला सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत राजपथ-रफी मार्ग, राजपथ-जनपथ, राजपथ-मानसिंग रोड आणि राजपथ- सी-हेक्सागन या मार्गांवर वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. परेड करण्याचा मार्ग मागिल वर्षाप्रमाणेच छोटा असेल. परेड मार्चिंग पार्टी लाल किल्याएवजी इंडिया गेट सी-हेक्सागन येथे समाप्त होईल. सेंट्रल व्हिस्टा अंतर्गत पुनर्विकसित राजपथ विजय चौक ते इंडिया गेट दरम्यान परेड करणाऱ्यासाठी खुला करण्यात आला आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त बैठक व्यवस्था ही कमी केली जावू शकते. कारण प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यादरम्यान कोरोनाची तिसरी (Corona) लाट येण्याची शक्यता आहे . प्रजासत्ताक सोहळा 23 जानेवारीपासून सुरू होणार असून भारतात 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT