Supreme Court Dainik Gomantak
देश

Re classification of the caste system: "कायद्याचा दुरुपयोग थांबवा"; जातिव्यवस्था पुनर्रचनेची मागणी करणाऱ्यांना CJI चंद्रचूड यांनी फटकारले

Supreme Court: अशाच प्रकारची आणखी एक याचिका वकील सचिन गुप्ता यांनी दाखल केली होती. ती याचिकाही न्यायालयाने फेटाळली.

Ashutosh Masgaunde

PIL on Re classification of the caste system:

जातिव्यवस्थेची पुनर्रचना करणासाठी केंद्र सरकारला निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका, सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (४ जुलै) फेटाळून लावली.

सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांनी एका वकिलाने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आणि याचिकाकर्त्याला ₹ 25,000 चा दंड ठोठावला.

ही जनहित याचिका न्यायालयाच्या प्रक्रियेचा दुरुपयोग आहे. आम्ही ती फेटाळून लावतो आणि सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनला ₹ 25,000 ची रक्कम भरण्याचे निर्देश देतो. याचिकाकर्त्याने दोन आठवड्यांच्या आत पेमेंटची पावती सादर करावी.
सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड

जातिव्यवस्थेच्या पुनर्वर्गीकरणासाठी केंद्राला निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या वकील सचिन गुप्ता यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती.

यानंतर, न्यायालयाने आरक्षण टप्प्याटप्प्याने काढून टाकण्यासाठी आणि पर्यायी आरक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी याचिकाकर्त्याने दाखल केलेल्या दुसर्‍या जनहित याचिकेचीही दखल घेत ती फेटाळून लावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT