Court Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh Crime: अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला 38 दिवसांत न्यायालयाने सुनावली 25 वर्षांची शिक्षा

Court: दोषीला 25 वर्षांची शिक्षा आणि 60,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या रकमेपैकी 50 हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेश दिले.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime: यूपीमधील अमरोहा जिल्ह्यात 11 वर्षीय मुलीवर 100 रुपयांचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी पॉक्सो न्यायालयाने 38 दिवसांत या प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली.

दोषीला 25 वर्षांची शिक्षा आणि 60,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या रकमेपैकी 50 हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेश दिले. अटक झाल्यापासून हा आरोपी मुरादाबाद तुरुंगात बंद होता.

दरम्यान, हसनपूर शहरातील एका भागात 10 जून 2023 रोजी ही घटना घडली. येथील एक मजूर नोकरीनिमित्त बाहेर गेला होता. त्याची पत्नी आणि 11 वर्षांची मुलगी (Girl) घरात एकटीच होती. आईने मुलीला जवळच्या दुकानात फोन दुरुस्त करुन आणण्यासाठी पाठवले होते.

याचाच फायद घेत आरोपी दानिशने मुलीला शंभर रुपयांचे आमिष दाखवून घरातून नेले. दानिशने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी (Police) दानिशला अटक केली. कपिला राघव यांच्या न्यायालयाने दानिशला दोषी ठरवत मंगळवारी शिक्षा सुनावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: किंग कोब्राला चक्क किस करण्याचा प्रयत्न; पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून लोकांची धाकधूक वाढली, पाहा व्हायरल व्हिडिओ

Election Commission: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारवाईला आम्ही कंटाळलो! 'गोवा काँग्रेस पक्ष' नोंदणी प्रक्रियेसंदर्भात कोर्ट नाराज

VIDEO: वकिलाची गाडी अडवून मारहाण अन् शिवीगाळ, आमदार पुत्राची गुंडगिरी; तक्रारीनंतरही FIR नाही, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल!

Myanmar Airstrike: म्यानमारमध्ये मृत्यूचं भयानक तांडव! गजबजलेल्या बाजारात अचानक हवाई हल्ला; 49 जणांचा मृत्यू; 58 जखमी, थरारक VIDEO समोर

Horoscope: संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ शुभ योग! बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' 5 राशींचे उघडणार नशिबाचे दरवाजे, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

SCROLL FOR NEXT