NIA Raids Dainik Gomantak
देश

Rameshwaram Cafe Blast: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाचे यूपी कनेक्शन; एनआयएने केली बरेलीतून एका संशयिताला अटक

Rameshwaram Cafe Bomb Blast: एनआयएचे पथक दुपारी दोनच्या सुमारास परतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NIA (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) लखनऊची टीम दोन दिवस बरेलीमध्ये होती.

Manish Jadhav

Rameshwaram Cafe Bomb Blast: बंगळुरुमधील बॉम्बस्फोट प्रकरणी बुधवारी पहाटे एनआयएच्या पथकाने बरेली येथील धार्मिक स्थळावरुन एका विशिष्ट समुदायातील व्यक्तीला अटक केली. त्याची चौकशी करण्यात आली. मजिस्ट्रेटच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NIA (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) लखनऊची टीम दोन दिवस बरेलीमध्ये होती. विशेष म्हणजे, पोलिसांना याबाबत कल्पनाही नव्हती.

दरम्यान, बुधवारी पहाटे चार वाजता मजिस्ट्रेटच्या नेतृत्वाखालील NIA चे पथक धौरतांडा, भोजीपुरा येथील प्रभाग क्रमांक 5 मध्ये पोहोचले. विशिष्ट समुदयाच्या व्यक्तीच्या घरावर छापेमारी करण्यात आली. छापेमारीदरम्यान कुटुंबीयांची चौकशी केली असता संबंधित व्यक्ती धार्मिक स्थळी असल्याचे सांगण्यात आले. पथकाने फौजफाट्यासह पाच वाजण्याच्या सुमारास धार्मिक स्थळी पोहोचून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. पथकाने त्याला पोलीस ठाण्यात नेले. मात्र, पोलिसांना चौकशीपासून दूर ठेवण्यात आले. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी बंद खोलीत तब्बल पाच तास या व्यक्तीची चौकशी केली. 1 मार्च 2024 रोजी बंगळुरुमधील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट झाला तेव्हा धौरतांडा येथील व्यक्तीचे लोकेशन कर्नाटकात असल्याचे उघड झाले होते.

दुसरीकडे, तेथील सुरक्षा यंत्रणांनी तपास केला असता संबंधित व्यक्ती सध्या धौरतांडा, भोजीपुरा येथे असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर कर्नाटकच्या गुप्तचर पथकांनी एनआयए लखनऊशी संपर्क साधला. पथकाने चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तीचा जबाबही घेतला. व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्यानंतर टीमने संबंधित व्यक्तीला 2 वाजता सोडून दिले. चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तीने कर्नाटकातील इतर अनेकांची नावे उघड केली आहेत. मात्र एनआयएने संबंधित व्यक्तीला सांगितले की, जेव्हाही चौकशीला बोलावले जाईल तेव्हा हजर व्हावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT