Parliament Dainik Gomantak
देश

Rajya Sabha Elections: राजस्थानात काँग्रेसचा बोलबाला,भाजपच्या खात्यात एक जागा

राज्यसभा निवडणुकीसाठी राजस्थानमधील चार जागांचे निकाल जाहीर झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

Rajya Sabha Election Result 2022: राज्यसभा निवडणुकीसाठी राजस्थानमधील चार जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. राज्यात सत्ताधारी काँग्रेसला तीन जागा जिंकण्यात यश आले आहे, तर भाजपच्या खात्यात एक जागा आली आहे. मीडिया दिग्गज सुभाष चंद्रा अपक्ष म्हणून रिंगणात होते, त्यांनाही भाजपचा पाठिंबा होता, मात्र तरीही त्यांना यश मिळू शकले नाही. चंद्रा यांना 30 मते मिळाली.

दरम्यान, काँग्रेस (Congress) नेते मुकुल वासनिक आणि रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांना अतिरिक्त मते मिळाली. भाजपच्या आमदार शोभा राणी कुशवाह यांनी क्रॉस व्होट केले, त्याचप्रमाणे भाजपचे अधिकृत उमेदवार घनश्याम तिवारी यांनाही दोन अतिरिक्त मते मिळाली.

तसेच, राजस्थानमधील (Rajasthan) राज्यसभा निवडणुकीबाबत काँग्रेसचे मुख्य रणनीतीकार आणि राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी पक्षाच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, "राजस्थानमधील राज्यसभेच्या तीन जागांवर काँग्रेसचा विजय हा लोकशाहीचा विजय आहे. प्रमोद तिवारी, मुकुल वासनिक आणि रणदीप सुरजेवाला या तिन्ही नवनिर्वाचित खासदारांचे मी अभिनंदन करतो.

दुसर्‍या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, "काँग्रेसकडे तीनही जागांसाठी आवश्यक बहुमत असल्याचे सुरुवातीपासूनच स्पष्ट झाले होते परंतु भाजपने अपक्षांना उभे करुन घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केला. आमच्या आमदारांच्या एकजुटीने या प्रयत्नाला चोख प्रत्युत्तर दिले आहे. 2023 भाजप विधानसभा निवडणुकीतही अशाच प्रकारे पराभवाला सामोरे जावे लागेल.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

VIDEO: 'भगवान श्रीकृष्ण दिवसातून पाच वेळा नमाज पठण करायचे', मौलाना जरजिस अंसारीचा खळबळजनक दावा; हिंदू संघटना आक्रमक

Nicholas Pooran Century: 13 षटकार, 5 चौकार, 321 चा स्ट्राइक रेट… निकोलस पूरननं ठोकलं वादळी शतक; गोलंदाजांची काढली पिसं VIDEO

SCROLL FOR NEXT