Rahul Gandhi  Dainik Gomantak
देश

कोण आहे भारत माता? काँग्रेस नेते राहुल गांधींचा सवाल; सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया...

Rajasthan Assembly Elections: राजस्थान विधानसभा निवडणुकीदरम्यान कॉंग्रेस आणि भाजप यांच्यातील प्रचार अधिक तीव्र होत चालला आहे.

Manish Jadhav

Rajasthan Assembly Elections: राजस्थान विधानसभा निवडणुकीदरम्यान कॉंग्रेस आणि भाजप यांच्यातील प्रचार अधिक तीव्र होत चालला आहे. दोन्ही पक्षांचे राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.

यातच आता, कॉंग्रेस नेते राहुल गांधींचा राजस्थानमधील रॅलीदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राहुल एक प्रश्न विचारताना दिसत आहेत. राहुल विचारतात की, "कोण आहे भारत माता?" राहुल यांच्या या प्रश्नावर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली. राहुल गांधींच्या प्रश्नावर लोक आपआपल्या प्रतिक्रिया देत आहे.

दरम्यान, राहुल गांधींचा (Rahul Gandhi) व्हिडिओ विविध व्याख्या आणि हास्यपूर्ण टेकचा केंद्रबिंदू बनला आहे. रॅलीतील वक्तव्याचा हेतू स्पष्ट नसला तरी, नेटिझन्सना मीम्स, विनोदी वन-लाइनर आणि व्यंग्यात्मक पोस्ट तयार करण्याची संधी मिळाली.

"पंतप्रधानांनी 'भारत माता की जय' ऐवजी 'अदानी जी की जय' म्हणावे, कारण ते त्यांच्यासाठीच काम करतात.", अशी टोलेबाजी राहुल गांधींनी राजस्थानमधील बुंदी इथे एका सभेला संबोधित करताना केली.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सरकारमध्ये अदानी समूहाला अनुचित लाभ झाल्याचा आरोप देखील राहुल यांनी यावेळी केला. अमेरिकन रिसर्च ग्रुप हिंडेनबर्गच्या आरोपानंतर अदानी समूहावरील (Adani Group) चौकशीची मागणी आमच्या पक्षाने सातत्याने केली. संयुक्त संसदीय समीतीच्या माध्यमातून अदानी यांची चौकशी केली जावी अशी मागणी आम्ही सातत्याने करत होतो, असेही राहुल यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

RCBच्या स्टार खेळाडूचा मोठा निर्णय! संघाला ठोकला रामराम; आता 'या' संघाकडून खेळताना दिसणार

Mormugao Municipality Waste Segregation Training: मुरगाव पालिका क्षेत्रातील शाळांमध्ये कचरा वर्गीकरणाचे चार टप्पे; प्रशिक्षण कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद

Bicholim Food Court: डिचोलीतील 'फूड कोर्ट' अंधारात; दीड महिन्यापासून वीज दिवे बंद; व्यावसायिकांचा उदरनिर्वाह धोक्यात

Seattle Center Shooting: अमेरिकेतील सिएटलमध्ये फूड फेस्टिव्हलदरम्यान अंदाधुंद गोळीबार; दोन ठार, पाच जण जखमी Watch Video

Salcete No Development Zone: सासष्टीतील 1.02 कोटी चौमी जमीन 'ना विकास क्षेत्र' करण्याचा प्रस्ताव! 5 गावांचा समावेश, ३० दिवसांच्या आत सूचना व हरकती मागविण्यात आल्या

SCROLL FOR NEXT