Delhi Weather Update  Dainik Gomantak
देश

दिल्लीत पावसाने 122 वर्षांचा मोडला विक्रम, वाचा IMDचा अंदाज

हवामानामुळे या भागात तणाव वाढेल.

दैनिक गोमन्तक

डोंगराळ राज्यांमध्ये सातत्याने होत असलेल्या हिमवृष्टीमुळे मैदानी भागात कडाक्याची थंडी आहे. विशेषत: दिल्ली-एनसीआरमधील लोकांना थंडी आणि धुक्याच्या दुहेरी हल्ल्याचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने (Rain) थंडी वाढवली आहे. धुक्यामुळे सूर्यदेवाचे दर्शनही दुर्मिळ झाले आहे. दरम्यान, सध्या तरी लोकांना थंडीपासून दिलासा मिळणार नसल्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. (Delhi Weather Update News)

हवामानामुळे या भागात तणाव वाढेल

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील दोन दिवसांत पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात दाट धुके पडेल. त्याचबरोबर 25 ते 27 जानेवारी दरम्यान थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. 27 जानेवारीपर्यंत मध्य प्रदेशात दाट धुके राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे. याशिवाय 26 जानेवारीपर्यंत राज्यात थंडीची लाट कायम राहणार आहे.

दिल्लीत पावसाने 122 वर्षांचा विक्रम मोडला

दिल्लीत जानेवारी महिन्यात झालेल्या पावसाने 122 वर्षांचा विक्रम मोडला असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. शनिवारी झालेल्या पावसानंतर दिल्लीत या महिन्यात 88.2 मिमी पाऊस झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. जानेवारी महिन्यात 1901 नंतर सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी राजधानी दिल्लीत 1989 मध्ये 79.7 मिमी आणि 1953 मध्ये 73.7 मिमी पाऊस पडला होता.

दिल्लीत पारा घसरणार

दिल्लीत किमान तापमानात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. सोमवारी राजधानीचे कमाल तापमान 17 अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान 7 अंशांपर्यंत राहील, असे हवामान खात्याने सांगितले. रविवारी दिल्लीचे किमान तापमान 11 अंश सेल्सिअस होते.

हिमाचल प्रदेशात अद्याप दिलासा मिळालेला नाही

दुसरीकडे, हिमाचल प्रदेशातील हवामानात सोमवारीही दिलासा मिळण्याची आशा नाही. हवामान खात्याने सोमवारी किन्नौर, लाहौल स्पीती, चंबा, मंडी, कुल्लू आणि शिमला येथे गडगडाटी वादळ आणि बर्फाचा पिवळा इशारा जारी केला आहे. बिलासपूर, कांगडा, सोलनमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT