Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला देशाचे शत्रू का म्हटले? विद्यार्थ्यांना दिला 'हा' मेसेज

Rahul Gandhi on UP Paper Leak: उत्तर प्रदेश पोलीस भरती पेपर लीक प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केंद्र आणि भाजपशासित उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली.

Manish Jadhav

Rahul Gandhi on UP Paper Leak:

उत्तर प्रदेश पोलीस भरती पेपर लीक प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केंद्र आणि भाजपशासित उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली. केंद्र सरकार देशाच्या भविष्याचे शत्रू असल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्याने X (पूर्वीचे ट्विटर) केंद्र सरकारवर टीका केली. नुकतीच उत्तर प्रदेश पोलीस भरती परीक्षेचा पेपर लीक झाल्याची घटना समोर आली आहे, त्यानंतर विरोधी पक्षांकडून सातत्याने वक्तव्ये केली जात आहेत.

विद्यार्थी न्यायालयाच्या चकरा मारत आहेत

राहुल गांधी पुढे म्हणाले की, ''देशातील विद्यार्थी सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहेत, कुठे विद्यार्थी भरतीची चातकासारखी वाट पाहत आहेत, तर कुठे पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशा वाढत आहे, तर कुठे नियुक्ती पत्रासाठी न्यायालयामध्ये चकरा माराव्या लागत आहेत.'' ते पुढे असेही म्हणाले की, 'विद्यार्थ्यांनी आवाज उठवला तर त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो.' मिळालेल्या माहितीनुसार, पेपरफुटीची तक्रार मिळाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी होणारी पोलीस भरती परीक्षा रद्द केली आहे.

पेपर रद्द झाला तर पुढे काय?

ज्या संस्थांमध्ये रोजगाराच्या संधी आहेत, अशा संस्थांना त्यांच्या मित्रांना विकायचे आणि त्यात तरुणांना कंत्राटावर काम करायला लावायचे, असे केंद्र सरकारचे धोरण असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. लोकसभेत भाजपच्या घोषणाबाजीचाही त्यांनी समाचार घेतला. शोषण ही या सरकारची हमी असल्याचे ते पुढे म्हणाले. त्याचवेळी, उत्तर प्रदेश सरकारने पुढील सहा महिन्यांत पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश जारी केले आहेत. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT