Rahul Gandhi
Rahul Gandhi 
देश

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी राहूल गांधींचे मोदींना चार सल्ले

गोमन्तक वृत्तसेवा

नवी दिल्ली: कॉंग्रेस(Congress) नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान, राहुल गांधींनी कोरोना विषाणूबाबत(Covid-19) केंद्र सरकारवर(Modi Government) जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला आटोक्यात आणण्यासाठी मोदी सरकार तयार नव्हते, पण आता तरी सरकारने कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी तयार असले पाहिजे. या दरम्यान त्यांनी कॉरोनावर कॉंग्रेस पक्षाने सादर केलेली श्वेतपत्रिकाही प्रसिद्ध केली. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेबाबत सरकारला अगोदरच चेतावणी देण्यात आली होती, परंतु सरकारने कोणतीही पुर्वतयारी केली नाही, ज्यामुळे बरेच लोकांचा मृत्यू झाला.

लसीकरण पूर्ण करण्यावर भर द्या

राहुल गांधी म्हणाले की, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना केंद्राने नुकसान भरपाई द्यावी, जेणेकरून त्यांना मदत आणि त्याच्या कुटुंबीयांना मदत होइल. त्याचबरोबर 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यावर भर द्यावा. जेणेकरून कोरोनाच्या तिसर्‍या लाटेशी लढायला मदत होईल.

पंतप्रधानांच्या अश्रूंनी या वेदना विसरता येणार नाही

देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मरण पावले जाणारे बहुतेक लोक तरुण वयाचे होते. जर त्यांना योग्य वेळी ऑक्सिजन मिळाला असता तर त्यांचे प्राण वाचले असते. अशी अनेक कुटुंबे आहेत ज्यांच्या पालक, भावंडांचा मृत्यू झाला, मुलं पोरकी झाली, पंतप्रधानांच्या अश्रूंनी त्यांचे दु:ख कमी होवू शकत नाही. पंतप्रधानांनी स्वतःचे उगाच कौतुक करून घेवू नये, असे, उद्गार राहून गांधी यांनी काढले.

श्वेतपत्रिकेतील चार महत्वाची मुख्य मुद्दे

1. तिसर्‍या वेव्हच्या तयारीविषयी नियोजन.
2. गरीब, छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक मदत द्या.
3. कोविड नुकसान भरपाई निधी द्यावा.
4. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या व्हेववेळी केलेल्या चुकांची कारणे शोधा आणि भविष्यात या चुका होणार नाहीत यासाठी नियोजन करा

 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

‘या’ देशाच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या, खळबळजनक खुलासा; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Supreme Court: राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्यांना कोर्टाने फटकारले; आदेशाच्या उल्लंघनबाबत बजावली अवमानाची नोटीस

SCROLL FOR NEXT