Rahul Gandhi T-Shirt Dainik Gomantak
देश

Rahul Gandhi T-Shirt: पुन्हा थंडी, पुन्हा हाफ टी-शर्ट... राहूल गांधींना पत्रकाराने विचारले कारण

कडाक्याच्या थंडीत राहुल गांधी हाफ टी-शर्टमध्ये असताना मीडियावाल्यांनी त्यांना प्रश्न विचारले.

दैनिक गोमन्तक

आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा 138 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. काँग्रेस स्थापना दिनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी माजी अध्यक्षा सोनिया गांधी त्यांचे पुत्र राहुल गांधी यांच्यासह पक्ष कार्यालयात पोहोचल्या आहेत. त्यावेळी राहुल गांधी पुन्हा एकदा हाफ टी-शर्टमध्ये दिसले.

कडाक्याच्या थंडीत (Winter) राहुल गांधी हे हाफ टी-शर्टमध्ये फिरत आहेत. त्यामुळे त्यांना मीडियावाल्यांनी प्रश्न विचारले की तुम्हाला थंडी वाजत नाही का? यावर राहूल यांनी हसत हसत उत्तर दिले आणि म्हणाले, "टी-शर्ट जोपर्यंत चालणार तोपर्यंत चालू राहील." दिल्लीतील सध्या कडाक्याची थंडी आहे. तरी सुध्दा राहुल गांधी (Rahul Gandhi) हाफ टी-शर्टमध्ये दिसत आहेत. नुकतेच देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीवर पोहोचून त्यांना श्रद्धांजली वाहिली. यादरम्यान राहुल हाफ टी-शर्टमध्ये दिसले होते, त्यानंतर सर्वजण प्रश्न करू लागले की राहुलला थंडी वाजत नाही का?

  • राहुल गांधी एक योगी - काँग्रेस नेते

काँग्रेस नेत्या रिया चौधरी यांनी त्यावेळी राहुल गांधींचा फोटो (Photo) शेअर करत त्यांना योगी म्हटले होते. त्यांनी लिहिले की, "डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीतही केवळ टी-शर्ट घातलेला अलसुबा यात्रेचा योगी असू शकतो. राहुल गांधींच्या या भावनेला आणि धैर्याला सलाम."

  • राहुल तपश्चर्या करतोय - पप्पू यादव

बिहारचे नेते पप्पू यादव यांनीही राहुलचा फोटो शेअर करत लिहिले की, "खरोखर, राहुल तपश्चर्या करत आहेत. या थंडीत अनवाणी पायांनी, फक्त टी-शर्टमध्ये, देशाला भ्रष्ट हुकूमशहांपासून मुक्त करण्याचा संकल्प आहे का, 'हम दो हमारे दो' स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुरु असलेला चळवळ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ECB New Rules: दारूला पूर्ण बंदी, सोशल मीडियावरही नियंत्रण! क्रिकेटपटूंसाठी बोर्डाचे 6 कडक नियम लागू, शिस्तभंगावर करडी नजर

VIDEO: "मनीषाशीच लग्न लावा, नाहीतर जीव देईन"; तरुणी चढली मोबाईलच्या टॉवरवर, समलैंगिक प्रेमप्रकरणाचा हायव्होल्टेज ड्रामा

Crime News: आईवर डोळा, मुलगा ठरला अडथळा; आठ वेळा जमिनीवर आपटून दीड वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा

Rajpal Yadav Jail: राजपाल यादवच्या अडचणीत वाढ! चेक बाऊन्स प्रकरणात हाय कोर्टाचा दणका, 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

SCROLL FOR NEXT