Bharat Jodo Yatra| Rahul Gandhi | Bharat Jodo Yatra in Delhi Dainik Gomantak
देश

राहुल गांधींची 'Bharat Jodo Yatra' राजधानी दिल्लीत, लाल किल्ल्यावर घेणार जाहीर सभा

Bharat Jodo Yatra: काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरुवात झाली.

दैनिक गोमन्तक

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरूच आहे. आज 108 व्या दिवशी ही यात्रा देशाची राजधानी दिल्लीत दाखल झाली आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा शनिवारी सकाळी साडेसहा वाजता बदरपूर सीमेवरून दिल्लीत दाखल झाली आहे. भारत जोडो यात्रा सकाळी साडेदहा वाजता आश्रम चौकाजवळ पोहोचेल. यानंतर दुपारी साडेचार वाजता ही यात्रा लाल किल्ल्यावर पोहोचेल.

दिल्ली काँग्रेसने भारत जोडो यात्रेत सहभागी होणाऱ्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मास्क घालून येण्याचे निर्देश दिले आहेत.

  • राहुल गांधी लाल किल्ल्यावरून भाषण करणार

हरियाणातील फरिदाबाद येथील NHPC मेट्रो स्टेशनपासून काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली. भारत जोडो यात्रा 4:30 वाजता लाल किल्ल्यावर पोहोचत आहे. येथे राहुल गांधी भाषण करणार आहेत. राहुल गांधींच्या या दौऱ्यात मोठ्या संख्येने पादचारी आणि वाहने सहभागी होण्याची शक्यता आहे. भारत जोडो यात्रेतील गर्दी पाहता वाहतूक पोलिसांनीही लोकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे.

  • दिल्लीतील भारत जोडो यात्रेचा मार्ग

भारत जोडो यात्रेत सहभागी लोक दुपारी आश्रम चौकाजवळील धर्मशाळेत जेवण आणि विश्रांती घेतील. त्यानंतर ही यात्रा निजामुद्दीन, इंडिया गेट सर्कल, आयटीओ, दिल्ली कॅंट, दर्यागंज मार्गे लाल किल्ल्यावर पोहोचेल. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे अनेक नेते राजघाट, वीरभूमी आणि शक्तीस्थळ आणि शांती वन येथे पोहोचून श्रद्धांजली वाहणार आहेत.

  • 7 सप्टेंबरपासून हा प्रवास सुरू झाला

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला 7 सप्टेंबरला कन्याकुमारी येथून सुरुवात झाली होती. या यात्रेने आतापर्यंत 9 राज्यांचा समावेश केला आहे. यामध्ये तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांचा समावेश आहे. 

पण हरियाणात दुसरा टप्पा अजून व्हायचा आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर 3 जानेवारी 2023 रोजी पदयात्रा पुन्हा सुरू होईल. नवीन वर्षात यूपी, हरियाणानंतर ही यात्रा पुन्हा पंजाब आणि जम्मू-काश्मीरसाठी रवाना होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ T20: अभिषेक-सॅमसन जोडीचा धमाका! रोहित-राहुलचा मोडला 6 वर्ष जुना रेकॉर्ड; न्यूझीलंडमध्ये रचला नवा कीर्तिमान

Mohan Bhagwat Vijayadashami Speech: मोहन भागवतांचा 'विश्वगुरू भारताचा' मंत्र; विविधतेचा स्वीकार, समतोल विकास आणि संस्कारांवर भर

Kanpur Crime News: कारच्या छतावर बांधून दीड किमी फरफटत नेलं अन् नंतर चिरडलं... जुनी दुश्मनी ठरली जीवघेणी! कानपूरमध्ये तरुणाची निर्घुण हत्या VIDEO

Cricketer Suspension: न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सामन्यापूर्वी मोठा धक्का! स्टार खेळाडूवर निलंबनाची कारवाई; नेमकी काय चूक केली?

Congress Party: 'राहुल गांधींची सभा पार्किंगच्या जागेत, ही काँग्रेसची नामुष्की’; दिगंबर कामत यांचा टोला

SCROLL FOR NEXT