Pushpa 2 Premiere: 'पुष्पा 2' च्या प्रीमियरदरम्यान चेंगराचेंगरी Dainik Gomantak
देश

Pushpa 2 Premiere: 'पुष्पा 2' च्या प्रीमियरदरम्यान चेंगराचेंगरी, 1 महिलेचा मृत्यू, 2 मुले जखमी

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाचा बुधवारी हैदराबादमध्ये प्रीमियर झाला, ज्यादरम्यान चेंगराचेंगरी झाली. संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाचा बुधवारी हैदराबादमध्ये प्रीमियर झाला, ज्यादरम्यान चेंगराचेंगरी झाली. संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी (4 डिसेंबर) अल्लू अर्जुन 'पुष्पा 2' च्या स्क्रिनिंगसाठी हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये पोहोचला होता. अल्लूला पाहण्यासाठी थिएटरबाहेर मोठ्यासंख्येने त्याचे चाहते जमले होते. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली. जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू आणि दोन जण जखमी झाले.

अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित चित्रपट पुष्पा 2: द रुल आज 5 डिसेंबर 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तत्पूर्वी एक दिवस आधी बुधवारी रात्री आरटीसी चौकात असलेल्या संध्या थिएटरमध्ये प्रीमियर शो झाला, ज्यादरम्यान एका 39 वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला. तर तिच्या मुलांची प्रकृती गंभीर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिलसुखनगरमधील रेवती यांनी पती भास्कर आणि आपल्या दोन मुलांसह चित्रपटाच्या प्रीमियरला हजेरी लावली होती. यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत रेवती यांचा मृत्यू झाला.

लोकांनी मदत केली, पण महिलेचा मृत्यू झाला

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलिस आणि आसपासचे लोक पीडितेच्या मदतीसाठी धावताना दिसत आहेत. रेवती यांना रुग्णालयात नेण्यापूर्वी त्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मुलाची प्रकृती चिंताजनक असून रेवती यांचा मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

SCROLL FOR NEXT