Sidhu Moose Dainik Gomantak
देश

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला अनंतात विलीन

गोल्डी ब्रार याने सिद्धू मूसेवालाच्या हत्येची स्वीकारली जबाबदारी

दैनिक गोमन्तक

पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची हत्या झाली होती. यानंतर पंजाब, दिल्लीसह देशातील विविध राज्यांमध्ये निदर्शने झाली. यावेळी काँग्रेसने या हत्येला राजकीय हत्या ठरवत मूस वालाची सुरक्षा का कमी करण्यात आली असा सवाल केला होता. या सर्व राजकिय घडामोडीनंतर पंजाबी गायक आणि काँग्रेस नेत सिद्धू मुसेवाला आज अनंतात विलीन झाले. त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. (Punjabi singer Sidhu Musewala merges with Infinity )

यावेळी त्यांच्या गावात मोठी गर्दी असल्याने पोलीसांना तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, सिद्धू मुसेवाला यांच्या मृत्यूची चौकशी होणार आहे. जोपर्यंत चौकशीचे आदेश येत नाहीत, तोवर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती. आदेश मान्य करण्यात आल्यानंतर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

गोल्डी ब्रार याने सिद्धू मूसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली

पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मूसेवाला च्या हत्येनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. पंजाबमधील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा कॅनडास्थित साथीदार गोल्डी ब्रार याने सिद्धू मूसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धू मूसेवाला हा लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीचा बराच काळ टार्गेट होता. अवघ्या २८ वर्षांच्या सिद्धूच्या हत्येने संपूर्ण पंजाब हादरला आहे. चाहत्यांच्या मनात असाही प्रश्न आहे की सिद्धू मूसेवाला बिष्णोई टोळीच्या निशाण्यावर का होता? नेमकी कोणत्या कारणामुळे त्याचा खून करण्यात आला ?

पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येनंतरच्या घडामोडी

पंजाबमधील आप सरकारकडून सुरक्षा काढून घेण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रविवारी मानसा जिल्ह्यामध्ये सिद्धू यांची अज्ञातांनी गोळ्या मारून हत्या केली होती. त्यामुळे आप सरकारवर चौफेर टीका होत आहे. सिद्धू यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन काल करण्यात आले. 5 डॉक्टर्सच्या टीमने शवविच्छेदन केले होते. दरम्यान, उत्तराखंड स्‍पेशल टॉस्‍कच्या मदतीने काही संशयितांना पकडल्याची माहिती आहे. पकडण्यात आलेले लॉरेन्स बिश्नोई गँगचे सदस्य असल्याची माहिती समोर येत आहे. संशयितांना देहराडूनमधील नया गाव चौकीवर पकडण्यात आले. त्या सर्वांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT